Breaking News

सदाशिवनगर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सदाशिवनगर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२३ जानेवारी २०२५

आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या शुभहस्ते सागर उरवणे यांचा सत्कार....


 

सदाशिवनगर प्रतिनिधी : हुसेन मुलाणी

विमा क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय LIC  MDRT पुरस्कार सलग तीन वेळा मिळवल्याबद्दल व सदाशिवनगर आणि पुरंदावडे गावाला LIC चा बीमा ग्राम पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब यांनी सागर उरवणे यांचा सत्कार केला व पुढील कार्यास शु भेच्छा दिल्या .....सागर उरवणे यांचे गेल्या 20 वर्षातील विमा क्षेत्रातले काम हे उल्लेखनीय आणि कौतुकास्पद असून त्यांनी सदाशिवनगर व पंचक्रोशीत विम्याचा प्रसार आणि प्रचार मोठ्या स्वरूपात केलेला आहे असे गौरव उद्गार आमदार उत्तमराव जानकर यांनी काढले

२४ सप्टेंबर २०२२

भांबुर्डी ता माळशिरस उपसरपंच पदी आप्पासाहेब वाघमोडे यांची बिनविरोध निवड..


 

सदाशिवनगर प्रतिनिधी : हुसेन मकबूल मुलाणी 

 आज शनिवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी भांबुर्डी तालुका माळशिरस ग्रामपंचायत उपसरपंच पदी आप्पासाहेब वाघमोडे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने- पाटील ,भांबुर्डी सरपंच दादा वाघमोडे, पांडुरंग तात्या पिसे, कालिदास रुपनर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

११ सप्टेंबर २०२२

वारसा मदतीचा वसा जनकल्याणाचा, संजीवन फाउंडेशन कडून रेडे ता. माळशिरस येथे श्रवण यंत्र वाटप..

सदाशिवनगर प्रतिनिधी: हुसेन मकबूल मुलाणी
अ‍ॅड.श्री. संजय देवगुंडे यांच्या दिव्यांगांसाठीच्या "संजीवन आधार" या प्रकल्पातुन संजीवन फाउंडेशन व ग्रामपंचायत रेडे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी मोफत साहित्य वाटप कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये रेडे गावामधील 13 दिव्यांग व्यक्तींना श्रवण यंत्र वाटप करण्यात आली दिव्यांग हा समाजतील दुर्लक्षित घटक असून त्यांच्या जगण्यात सहजता आणि सुलभता यावी म्हणून त्यांना अश्या गरजेच्या वस्तू देऊन संजीवन फाउंडेशन कडून वेळोवेळी मदत केली जाते.
ज्ञानदेव संभाजी शेंडगे, आप्पा सदाशिव बर्वे, साधू जगू मदने, बापू सोपान बर्वे, सुरेखा बापू शेंडगे, उत्तम संभाजी शेंडगे, पोपट आगतराव काळे, सुनंदा पोपट शेंडगे, धनाजी राजाराम काळे, संभाजी पांडुरंग पारसे, नकुसाबाई सदाशिव कोळेकर, बाई गणपत पांढरमिसे या लाभार्थ्यांना श्रवण यंत्र वाटप करण्यात आले. परिसरातील ज्या दिव्यांगांना कानाची मशीन, व्हील चेअर, काठी, वॉकर, तीन चाकी सायकल आवश्यक असेल किंवा इतर काही अडचणी असतील तर 9922958683 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संजीवन फाउंडेशन कडुन करण्यात येत आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड.श्री. संजय देवगुंडे सर,ग्रामपंचायत सरपंच आप्पासाहेब शेंडगे यांनी यासाठी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापूराव काळे, वसंत बर्वे ,उपसरपंच महावीर शेंडगे, आनंद शेंडगे, सखाराम आबा शेंडगे, विलास पाटील उपस्थित होते.

०९ सप्टेंबर २०२२

आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते श्री शंकर सह साखर कारखान्याची सपत्नीक महायज्ञ पूजा संपन्न.....

सदाशिवनगर प्रतिनिधी: हुसेन मकबूल मुलाणी :
श्री शंकर सह साखर कारखाना लि.सदाशिवनगर येथे दोन दिवसाचा यज्ञ पुजेचा कार्यक्रम संपन्न झाला . ही महायज्ञ पुजा कारखान्याचे चेअरमन मा.श्री.रणजितसिंह मोहिते -पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सत्यप्रभादेवी मोहिते - पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते -पाटील व मा.सौ. नंदीनीदेवी (आईसाहेब) मोहिते -पाटील , बाजार समितीचे सभापती मा.श्री.मदनसिंह मोहिते - पाटील व मा.सौ.कांचनदेवी मोहिते - पाटील , शिवामृत दुध संघाचे चेअरमन मा.श्री. धैर्यशील मोहिते -पाटील,माजी जि.प. सदस्या स्वरूपाराणी(दिदीसाहेब ) मोहिते -पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते -पाटील, माजी सभापती मा.सौ. वैष्णवीदेवी मोहिते - पाटील तसेच सहकार महर्षि कारखान्याचे संचालक व अधिकारी ,शिवामृत संघाचे संचालक व अधिकारी ,माजी जि प सदस्य ,माजी पंचायत समिती सदस्य , सर्व शेतकरी सभासद,श्री शंकर सह साखर कारखान्याचे सर्व संचालक व अधिकारी ,कामगार वर्ग सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

०६ सप्टेंबर २०२२

सदाशिवनगर येथे प्रज्योत तात्या सालगुडे-पाटील मित्र मंडळ या गणेश मंडळाला पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.श्री.अर्जुनसिंह मोहिते - पाटील यांची सदिच्छा भेट

सदाशिवनगर प्रतिनिधी :हुसेन मकबूल मुलाणी
सदाशिवनगर येथे प्रज्योत तात्या सालगुडे-पाटील मित्र मंडळ या गणेश मंडळाला पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.श्री.अर्जुनसिंह मोहिते - पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी गणेश मंडळाच्या वतीने जादुचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर पी आय चे जिल्हाअध्यक्ष सोमनाथ भोसले ,चेअरमन प्रताप सालगुडे -पाटील, सरपंच देवीदास ढोपे ,मांडवे गावचे माजी सरपंच तानाजी पालवे, प्रशांत दोशी, संचालक अरविंद भोसले,डॉ भगत , सर्कल संदीप चव्हाण ,संजय शिंदे, संतोष शिंदे ,नंदु धाईजे, डॉ तन्वीर ,सुभाष सुज्ञे, उन्हाळी भाऊसाहेब, पांडुरंग थोरात, ज्ञानदेव पालवे,तानाजी ओवाळ ,रणनवरे काका, मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, कार्यकर्ते व सदाशिवनगर पुरदांवडे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

०४ सप्टेंबर २०२२

प्रज्योत तात्या मित्र मंडळ सदाशिवनगर गणेश मंडळाची आरती शौकत इमाम मुलानी यांच्या हस्ते संपन्न ....हिंदू मुस्लिम एकतेचा एक नवा संदेश... .

सदाशिवनगर प्रतिनिधी: हुसेन मकबूल मुलाणी:
प्रज्योत तात्या मित्र मंडळ सदाशिवनगर गणेश मंडळाच्या गणरायाची आरती धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्थेचे संचालक व मंडळाचे जेष्ट कार्यकर्ते श्री शौकत इमाम मुलानी यांच्या हस्ते आज रविवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी संपन्न झाली याप्रसंगी सदाशिवनगरचे माजी सरपंच प्रताप सालगुडे पाटील , शामराव जाधव , जिव्हाळा फाउंडेशन चे उपाध्यक्ष तन्वीर शेख ,संतोष गुराप्पा स्वामी मंडळाचे अध्यक्ष विश्वजीत सालगुडे पाटील, उपाध्यक्ष योगेश बबनराव शिदे, व्यवस्थापक जगदीशा सोनटक्के, रियाज मुलाणी व मंडळाचे सर्व कायेकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मंडळाने हिंदू मुस्लिम एकतेचा एक वेगळा आदर्श जगासमोर दाखवून दिला आहे त्यामुळे सदाशिवनगर परिसरामध्ये मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे
आरतीनंतर सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला सत्कार यामध्ये शौकत इमाम मुलाणी यांचा सत्कार मंडळाचे जेष्ट कार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला व रियाज शौकत मुलाणी यांचा सत्कार मंडळाचे माजी अध्यक्ष सागर उरवणे यांचे हस्ते करण्यातआला उपस्थित गणेश भक्तांना सायंकाळच्या प्रसादामध्ये शीरखुर्मा वाटप करण्यात आला सर्व गणेश भक्तांनी प्रसादाचा आनंद घेतला