Breaking News

कोळा जिल्हा परिषद गट पूर्ण ताकतीने लढविणार..- ऍड दह्याप्पा आलदर


 सांगोला प्रतिनिधी 

        कोळा जिल्हा परिषद गटात यंदा सर्वसाधारण पुरुष गणासाठी आरक्षण जाहीर झाल्याने, राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेक इच्छुकांसाठी ही एक मोठी राजकीय संधी निर्माण झाली असून, या संधीचे सोने करण्याचा निर्धार कोळे येथील एडवोकेट तसेच अहिल्या अर्बन सोसायटीचे चेअरमन दह्याप्पा आलदर यांनी व्यक्त केला आहे. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कोळा जिल्हा परिषद गट आपण लढण्यास उत्सुक असून, गुलाल आपलाच असे ठसून सांगितले जात आहे. 

    कोळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाच्या सर्व विकासासाठी कार्य करताना त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. तसेच अहिल्या अर्बन क्रेडिट सोसायटी जुनोनी या संस्थेवर चेअरमन, कोळा आदर्श पतसंस्था संचालक, राजमाता पतसंस्था सल्लागार म्हणून आलदर यांच्या कामाचा गवगवा कोळा परिसरात आहे. तसेच स्वर्गीय आनंदा राघू आलदर यांनी यापूर्वी सांगोला मार्केट कमिटी संचालक, कोळा विकास सेवा सोसायटी व्हाईस चेअरमन व भाई गणपतराव देशमुख यांचे विश्वासू निष्ठावंत सहकारी म्हणून गणले गेले असून, दया आप्पा आलदर हे त्यांचे सुपुत्र असून, त्यांना बालपणापासून घरात, दारात व कोळा परिसरात शेकाप चा बोलबाला दिसून आला व त्यामुळे पक्षीय बाळकडू घरातच मिळाले. 

     राजकारणाच्या पलीकडे आपण समाजकारणास प्राधान्य देत असून, नागरिकांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे, युवकांचे प्रश्न सोडवणे हेच आपले उद्दिष्ट आहे व जनशक्तीच्या आणि मतदाराच्या आशीर्वादावर आम्ही ही निवडणूक ताकदीने लढू व जनतेने दिलेली ही संधी विकास कामाच्या माध्यमातून परतफेड करू. 

    वकील दह्याप्पा आलदर यांनी मतदारांचा थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, प्रत्येक गावात विकासाच्या मुद्द्यावर चर्चा सध्या सुरू आहे. स्थानिक पातळीवर त्यांच्या नेतृत्वावर सकारात्मक चर्चा असून त्यांच्याकडे विकासाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. कोळा व परिसरात सर्वांच्या सुख दुःखात त्यांचा हिरीरीने सहभाग असून, कोळा व परिसरात त्यांच्या कामाची छाप, गावोगावी त्यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. जनतेच्या विश्वासावर आणि सहकार्यावर आम्ही पुढे जाणार आहोत असे सांगून आलदर यांनी निवडणुकीच्या रणधुमाळी ची चाहूल दिली आहे. कोळा जिल्हा परिषद गटात ही निवडणूक यंदा रंगतदार होणार असून, वकील दह्याप्पा आलदर यांच्या उमेदवारीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत