Breaking News

नातेपुते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नातेपुते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२९ ऑक्टोबर २०२२

नातेपुते येथिल स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमात विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अरुण कांबळे यांचा गौरव सत्कार...


 प्रतिनिधी / संतोष कदम

 नातेपुते :- (ता. माळशिरस) 28 ऑक्टोबर 2022 रोजी नातेपुते येथे झालेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. अरुण कांबळे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब यांचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ओमान देशाचे भारतीय दूतावासाचे द्वितीय सचिव मा. जयपाल देठे साहेब(IFS) यांच्या हस्ते यथोचित गौरव, सत्कार करण्यात आला .

यावेळी  मा. विशाल लोंढे साहेब  असिस्टंट कमिशनर समाज कल्याण कोल्हापूर, नायब तहसीलदार प्रतीक आढाव, ॲड.बी जी बनसोडे साहेब, एन डी एम जे या संघटनेचे राज्य सचिव मा.वैभव गीते व महासचिव ॲड. डॉ. केवल उके साहेब , विकास धाईंजे, सदस्य, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती, प्रसिद्ध उद्योजक विशाल जाधव साहेब मुंबई, डॉ. नागेश बनसोडे , सौ. लता कांबळे, आप्पा सोनवणे सर , सामाजिक कार्यकर्ते सुनिल साबळे, दंगल कार कवी नितीन चंदनशिवे , पत्रकार संतोष कदम , साप्ताहिक रयतेचा भीम प्रहारचे संपादक भीमसेन उबाळे , आदी मान्यवर उपस्थित होते.

०५ सप्टेंबर २०२२

सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना अंगीकृत रुग्णालयात मोफत उपचार मिळालेच पाहिजेत-वैभव गिते

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना भेटून चर्चा करून निवेदन दिले.
नातेपुते: प्रतिनिधी :
नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे शासकीय दौऱ्यावर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन सोयी सुविधांची माहिती घेण्यासाठी आले असता नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गिते व कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना भेटून निवेदन दिले निवेदनात माळशिरस तालुक्यातील सर्वजाती धर्मांच्या नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जण आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळावेत,योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालये रुग्णांकडून अतिरिक्त पैशांची मागणी करतात अशा रूग्णालयांवर कारवाई करण्यात यावी.अंगीकृत खाजगी रुग्णालयात सर्वच आजारांवर मोफत उपचार मिळावेत.माळशिरस ग्रामीण रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्वच आजारांवर मोफत उपचार मिळावेत.उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे रुग्णांची हेळसांड होत असून कर्तव्यात कसूर करणाऱ्यावर कारवाई करावी.योजनेचे तालुका समन्वयक व जिल्हा समनवयक जाणून बनून कसूर करीत आहेत त्यांची चौकशी करावी. योजनेचा प्रसार प्रचार करावा.इत्यादी मागण्यांचे निवेदन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना भेटून वैभव गिते यांनी दिले आहे.तात्काळ कार्यवाही करू असे आश्वासन मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहे.यावेळी माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते,जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर,माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर,तालुका आरोग्य अधिकारी मोहिते,माजी वैद्यकीय अधिकारी एम.पी.मोरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक संपांगे,नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व्होरा म्याडम,रिपाइंचे नातेपुते अध्यक्ष संघर्ष सोरटे,नवनाथ भागवत, अक्षय भागवत हे उपस्थित होते.