श्री खंडोबा बहुउद्देशीय संस्था प्रचलित पायोनियर संकुलन, यलमार मंगेवाडी येथे 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पायोनियर संकुलन, मंगेवाडी येथे 15 ऑगस्ट मोठ्या जल्लोषात आणि देशभक्तीच्या जोशात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हटले आणि तिरंग्याला मानवंदना दिली.
याप्रसंगी _पायोनियर संकुलनचे अध्यक्ष श्री. अनिल येलपले सर, सचिव सौ. मनीषा येलपले मॅडम, डीन श्री. सतीश देवमारे सर, प्राचार्य श्री. सोमनाथ आदलिंगे सर_ हे उपस्थित होते.
तसेच _यलमार मंगेवाडीचे डेप्युटी सरपंच श्री. अनिल पाटील_ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. _परमेश्वर केंगार माजी ग्रामपंचायत सदस्य, अमोल चौगुले ग्रामपंचायत सदस्य, काकासाहेब जाधव सर माजी मुख्याध्यापक राजाराम पाटील हायस्कूल आटपाडी, चंद्रकांत चौगुले माजी डेप्युटी सरपंच, अविनाश चौगुले बागायतदार बाळासाहेब घाटूळे, वसंत मासाळ, ज्ञानदेव मिसाळ, घाटोळे गुरुजी_ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये देशभक्तीपर भाषणे, शिस्तबद्ध कवायती तसेच गीते आणि नृत्य यांचा समावेश होता. मुलांच्या आत्मविश्वासाने दिलेल्या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आशुतोष रुपनर सर यांनी केले.
तर आभार प्रदर्शन श्री. जावीर सर यांनी केले.
संपूर्ण संकुलन तिरंगी रंगांनी सजले होते. वातावरण देशभक्तीने भारलेले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पायोनियर संकुलनचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत