Breaking News

पायोनियर संकुलन मंगेवाडीचे समूह नृत्य स्पर्धेत तिहेरी यश...!, सलग दुसऱ्या वर्षी वरिष्ठ गटात प्रथम क्रमांकाची कामगिरी


 सांगोला, प्रतिनिधी  

रोटरी क्लब व इनरव्हील क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय देशभक्ती गीतांवरील समूह नृत्य स्पर्धेत खंडोबा बहुउद्देशीय संस्थेचे पायोनियर शैक्षणिक संकुलन, मंगेवाडी च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय तिहेरी यश मिळवले.

या स्पर्धेत 1ली ते 4थी, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी अशा तीन वयोगटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. पायोनियर संकुलनाच्या विद्यार्थ्यांनी तिन्ही गटांमध्ये सहभाग घेत आपल्या सादरीकरणातून देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि भारतीय संस्कृतीचा प्रभावी संदेश दिला.

स्पर्धेच्या निकालात पायोनियर संकुलनाने बाजी मारली.  

इयत्ता 1ली ते 4थी गटात द्वितीय क्रमांक गटात ,  

इयत्ता 5वी ते 7वी गटात ,तृतीय क्रमांक तर  

इयत्ता 8वी ते 10वी गटात प्रथम क्रमांक पटकावला.

विशेष बाब म्हणजे रोटरी क्लबच्या या प्रतिष्ठित स्पर्धेत पायोनियर संकुलनाने सलग दुसऱ्या वर्षी वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली.

या यशासाठी विद्यार्थ्यांना नृत्य शिक्षक सुरज गोंजारी आणि प्रणोती कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल एलपले, सचिव मनीषा एलपले, डीन सतीश देवमारे, प्राचार्य सोमनाथ आदलिंगे, राज माळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत