Breaking News

इंदापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इंदापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०८ फेब्रुवारी २०२५

जागतिक साखर बाजारपेठेत भारताची महत्वाची भूमिका - हर्षवर्धन पाटील . -पुणे येथे कॉफको इंटरनॅशनल परिसंवाद ....


प्रतिनिधी , संतोष कदम.

  इंदापूर :-  जागतील साखर बाजारातील बदलत्या धोरणानुसार सतर्क राहणे आवश्यक आहे. जागतिक साखर बाजारपेठेत भारताची  भूमिका कायम महत्वाची राहिलेली आहे. आगामी काळातही भारत हा जागतिक बाजारपेठेत मजबूत राहण्यासाठी व्यापारातील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 7) केले.

        पुणे येथे कॉफको इंटरनॅशनल ( COFCO INTL) च्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीच्या सहकार्याने आयोजित शुगर कनेक्ट-2025 या परिसंवादामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. 

     ते पुढे म्हणाले, जागतिक साखर व्यापारामध्ये महाराष्ट्र राज्याची भूमिका देखील कौतुकास्पद  राहिलेली आहे. सन 2021-22 च्या हंगामात भारताने 110 लाख मे. टन साखरेची विक्रमी निर्यात केली तेव्हा 70 टक्के पेक्षा अधिकचे योगदान देऊन महाराष्ट्राने जागतिक साखर व्यापारात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. साखर निर्यातीमधून चांगला फायदा मिळवण्यासाठी साखर कारखान्यांनी स्पर्धात्मक राहण्यासाठी उच्च गुणवत्ता राखण्यावर भर दिला पाहिजे. जागतिक बाजारातील मागणी अभ्यासपूर्णरित्या समजून घेऊन आणि त्यांची पूर्तता करून, साखर कारखाने भविष्यात निर्यातीच्या संधी वाढवू शकतात, असे मतही हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केले. यावेळी कॉफको इंटरनॅशनलचे साखर व्यापाराचे जागतिक प्रमुख जोस एडुआर्डो टोलेडो व मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

    या परिसंवादामध्ये जागतील साखर व्यापारासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. तसेच व्यापार चर्चा व प्रश्नोत्तर सत्र संपन्न झाले.  कॉफकोचे भारतीय उपखंडातील साखर विभागाचे प्रमुख रवि कृष्णमूर्ती यांनी आभार मानले.

३१ जानेवारी २०२५

विद्यार्थ्यांनी सर्वांच्या सहभागाने सामाजिक कार्य उंचवावे- डॉ. महादेव वाळुंज....



प्रतिनिधी , संतोष कदम.

  इंदापूर :- राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर , कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भिगवन आणि श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने बिजवडी ता. इंदापूर येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे दि. 24 जानेवारी ते 30 जानेवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी वरील मत व्यक्त केले.

   युथ फॉर डिजिटल भारत , युथ फॉर डिजिटल लिटरसी हा उद्देश घेऊन शिबिरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .


       26 जानेवारी रोजी मुंबई येथे राष्ट्रीय सेवा योजना आरडी परेडसाठी भिगवन महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका चव्हाण हिची निवड झाली होती तिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

    भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाळुंज म्हणाले की विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारचा अहंकार सोडून, सर्वांच्या सहभागाने आपले सामाजिक कार्य उंचवावे.

        महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की मन मे है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब या प्रमाणे आपण आपले सर्व सामाजिक कार्य पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत राहू .

     बावडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे म्हणाले की,' शिबिर कालावधीतील सकारात्मक गोष्टी घेऊन आपल्या जीवनात याचा उपयोग करावा.'

     इंदापूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे म्हणाले की,' विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती करिता ही शिबिरे त्यांना मार्गदर्शक ठरतील.'

  यावेळी शिबिर अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रा. नामदेव पवार प्रा. प्रकाश करे  ,मयूर मखरे यांनी अहवालाचे लेखन केले.

    निकिता जाधव , इम्रान काझी , श्रीलेश विंचू या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

    कला शाखा विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर , विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यावेळी उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिगवन महाविद्यालयाचे रासेयो  कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिल बनसोडे यांनी केले.


    राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिर कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाविषयीची माहिती कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सुवर्णा जाधव यांनी दिली.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंदापूर महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.पुरुषोत्तम साठे यांनी केले.

   कार्यक्रमाचे आभार बावडा महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. तयाजी लोंढे यांनी आभार मानले.

     रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. उत्तम माने , प्रा. मनीषा गायकवाड , प्रा. धन्यकुमार माने , प्रा. सागर गुजराथी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला.

०८ नोव्हेंबर २०२२

वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्हा पूर्वाध्यक्षपदी राजकुमार व पुणे जिल्हा पूर्व सहसचिव गोविंद कांबळे यांची निवड झाल्याबद्दल महात्मा फुले कॉलनी वरील नागरिकांच्या वतीने सत्कार संपन्न


 प्रतिनिधी  /  संतोष कदम.

अंथुर्णे  :- ( ता. इंदापूर ) वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्हा पूर्व अध्यक्षपदी महात्मा फुले कॉलनी ( उखळमाळ) येथील सुपुत्र व माळशिरस विधानसभेचे उमेदवार राज यशवंत कुमार यांची निवड झाल्याबद्दल तसेच त्यांच्याबरोबर माजी सैनिक गोविंद कांबळे यांची सहसचिव पुणे जिल्हा पूर्व निवड झाल्याबद्दल राजगृह बुद्ध विहार समिती व कॉलनी वरील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सुनील केंगार, संतोष कांबळे, शेखर काटे, ग्रा.पं. माजी उपसरपंच संजय वंचाळे, पत्रकार संतोष कदम, दिलीप लोंढे सर, संजय  धिमधीमे, संतोष गवळी, अतुल बनसोडे, स्वप्निल धिमधीमे, सुरज गवळी, आण्णा ओव्हाळ, विकास खरात, अनिल पवार, दत्ता काटे, गुरुनाथ कदम, श्रीराज  केंगार, अविनाश अहिवळे, केराप्पा ओव्हाळ, मधु तोरणे आदी उपस्थित होते.

तसेच पुणे जिल्हास्तरीय पुणे येथे झालेल्या १२ ते १४ वयोगटातील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कॉलनी वरील धीरज रामचंद्र केंगार या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादित केले आहे. त्याबद्दल त्याचाही सत्कार राजगृह विहार समितीच्या वतीने करण्यात आला.

२४ सप्टेंबर २०२२

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळतात; निमगाव केतकी गावामध्ये शिवसैनिकांनी साखर वाटून आनंद उत्सव साजरा केला..


 इंदापूर प्रतिनिधी - संतोष कदम.

इंदापूर  :-  शिवतीर्थावर ती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला माननीय उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे, त्याचाच आनंद इंदापूर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने  निमगाव केतकी गावामध्ये साखर वाटून  फटाक्यांची आतीशबाजी करत आनंद उत्सव साजरा केला , शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी चालू केलेला दसरा मेळावा कोविड चा कालावधी वगळता अखंडितपणे शिवतीर्थावर ती पार पडत होता. एकच नेता एकच व्यासपीठ आणि असंख्य लाखो शिवसैनिक हे समीकरण महाराष्ट्राने बघितले .

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवतीर्थावरती विचारांचे सोने लुटण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होणार आहे त्यावेळेस आपणही उपस्थित रहा असे आवाहन यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अँड. नितीन कदम यांनी केले ,सदर कार्यक्रमा वेळी शिवसेनेचे निमगाव केतकीचे बबनराव खराडे उप तालुकाप्रमुख रणजीत बारवकर ,संजय भोंग ,जगन्नाथ आदलिंग ,अमोल जाधव ,श्याम शेंडे, प्रकाश जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावर्षीचा दसरा मेळावा ऐतिहासिक असेल आणि सर्व रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवणार असेल अशी आशा यावेळी अँड. नितीन कदम यांनी व्यक्त केली.

२२ सप्टेंबर २०२२

रिपब्लिक नेते संजय भैय्या सोनवणे यांची इंदापूर पोलीस निरीक्षक मुजावर साहेबांच्या उपस्थितीत टोल नाका तोडफोड आंदोलन संदर्भात बैठक संपन्न...


 

प्रतिनिधी  /  संतोष कदम.

  इंदापूर  :-  दि.21/9/2022 रोजी इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक मा.मुजावर साहेबांच्या उपस्थितीत टोल नाका तोडफोड आंदोलन संदर्भात बैठक संपन्न झाली या बैठकीला रिपब्लिकन नेते मा.संजय भैय्या सोनवणे तसेच सरडेवाडी टोल प्रशासनाकडून  तीन अधिकारी उपस्थित होते .या बैठकीत चर्चा झाली परंतु कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे उद्या इंदापूर ते हिंगणगाव पर्यंत सर्वांच्या उपस्थितीत हायवेची पाहणी केली जाणार आहे आणि पोलिस निरीक्षक मुजावर साहेब यांच्या उपस्थितीत उद्या आपल्या भागातील नागरिकांना सेवा कशा पध्दतीने टोल प्रशासनाकडून मिळायला पाहिजे त्या विषयावरती चर्चा होईल .टोल प्रशासनाला मान्य असेल तर चांगलीच गोष्ट आहे नाही तर संघर्ष अटळ आहे .

आजच्या बैठकीत रिपब्लिकन नेते मा.संजय भैय्या सोनवणे यांनी सर्व अधिकार्याच्या उपस्थितीत बैठकीत ठणकावून सांगितले नागरिकांना टोल प्रशासन न्याय देणार नसेल तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर पण स्थानिक युवकांना आणि नागरिकांना न्याय मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही .

३० ऑगस्ट २०२२

अंथुर्णे वार्ड क्रमांक एक उखळमाळ येथील महिलांचे अंथुर्णे ग्रामपंचायत समोर चूल पेटवून तीव्र आंदोलन..


 

प्रतिनिधी - संतोष कदम.
अंथुर्णे  :-  ( ता. इंदापूर ) देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारत सरकारने हर घर तिरंगा अभियान राबवले गेले. मात्र अंथुर्णे येथील वार्ड क्रमांक १ उखळमाळ येथील नागरिक, महिलांना राहण्यासाठी घरे नाहीत ते बेघर आहेत. त्यांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा देण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिक, महिलांनी चुल पेटवून तीव्र आंदोलन करण्यात आले.
 यावेळी अंथुर्णे ( मु ) उखळमाळ या मधील नागरिकांना राहण्यासाठी जागा मिळणे बाबत. उखळमाळ येथील नागरिकांच्या वतीने मा. ग्रामसेवक व सरपंच, सदस्य बॉडी ग्रामपंचायत अंथुर्णे यांना निवेदन देण्यात आले.
 निवेदनात म्हटले आहे. आम्ही 1952 पासून अंथुर्णे  गावचे रहिवासी असून अजूनही आम्ही बेघर अवस्थेत जीवन जगत आहे. तरी आम्हाला ग्रामपंचायतीकडे  जागा शिल्लक असताना सुद्धा आमच्याकडे दुर्लक्षित केले जाते. परंतु आज दि. ३०/८/२०२२ रोजी आम्ही गट क्रमांक ( ८८ ) मधील गायरान शिल्लक जागा आम्हाला नोंदणी करून आम्हाला द्यावी. अशी नम्र विनंती केलेली आहे.
 यावेळी संतोष कांबळे, शेखर काटे, राजू भोसले, अतुल बनसोडे, सुनील केंगार, संजय वंचाळे, संजय धिमधिमे, स्वप्निल धिमधिमे, सतीश भोसले, नाना गोसावी, सुरेश कांबळे, दीपक बनसोडे, मनोज रणदिवे, बबलू सोनवणे, ऋषिकेश लोंढे.
शितल साबळे, बायडाबाई कांबळे, विमल सोनवणे, रेखा वंचाळे, लक्ष्मी वंचाळे, मंदा कांबळे, मंगल कदम, अनिता सोनवणे, सुनिता खरात, कमल गवळी, विठाबाई मोरे, नगीना वाघमारे, करुणा मोठे, सुमन कांबळे, केसर मोरे आदी युवा वर्ग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होता.




२६ ऑगस्ट २०२२

शिरसटवाडी गावामध्ये कदम कुटुंबीयांच्या वतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा

इंदापूर प्रतिनिधी ‌‌/ संतोष कदम. शिरसटवाडी गावामध्ये सालाबाद प्रमाणे श्रावणी बैलपोळा साजरा करण्यात येतो. इंदापूर तालुक्यात आखाडी बेंदूर अथवा भाद्रपद महिन्यात बैलपोळा साजरा होतो. परंतु शिरसटवाडी गावामध्ये हा श्रावण महिन्यामध्ये साजरा होतो . त्यास ऐतिहासिक परंपरा आहे . बैलपोळा हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय घरातील आबालवृद्ध लहान मुलं सर्वच बळीराजांनी केलेल्या वर्षभराच्या कष्टाची उत्तराई करण्यासाठी बैलपोळा सण साजरा करतात. शेतकरी राजा हा आपले सर्जा राजाला धुवून स्वच्छ आंघोळ घालून रंगीबेरंगी रंगाने नटवुन शिंगांना बेगिडे तर व शेंडीला रंगवून अंगावरती रंगीबेरंगी साज चढवून हलगी वादनाच्या तुर्याच्या उताऱ्यांच्या उत्साहात फटाक्यांची आतीशबाजी करून बैलांची मिरवणूक शिरसटवाडी गावामधुन काढण्यात येते . मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापुढे देशी गाई व बैल जोडी उभा करून त्याचे पूजन केले जाते. जसा लग्न समारंभ असतो, तसा बळीराजाचा लग्न सोहळा सुद्धा आयोजित करतात . सर्जा राजाला प्रथम पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. ही जुनी परंपरा शिरसटवाडी गावामध्ये आज रोजी युवा पिढी जोपासताना दिसते. शिरसटवाडी गावातील कदम वस्ती येथे शेतकरी बुवासाहेब आबाजी कदम यांचे कुटुंबांच्या वतीने घरातील स्वप्निल कदम ,संग्राम कदम ,अमर कदम तर मुली स्वप्नाली कदम, प्रणिता कदम ,तेजल कदम ,आणि कुटुंबीयांनी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

२२ ऑगस्ट २०२२

बेलवाडी येथील सामुदायिक अत्याचाराची "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेने घेतली दखल

प्रतिनिधी : संतोष कदम. :- ( ता. इंदापूर ) शनिवार दि.२० ऑगस्ट २०२२ रोजी बेलवाडी गावात अल्पवयीन मागासवर्गीय मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली. याची दखल "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेने घेतली असुन सर्वच्या सर्व आरोपी लवकरात लवकर न पकडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवार दि.२२ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ११:१५ वाजता वालचंदनगर पोलीस स्टेशन वर जाऊन दिला. यावेळी निवेदन देताना वालचंदनगर पोलीस प्रशासनाचे psi मिलिंद मिठ्ठापल्ली, ठाणे अंमलदार ठोंबरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे हा खटला जलदगती न्यायालयात चालवुन पिडीत मागासवर्गीय मुलीला न्याय देण्यात यावा. बेलवाडी गावात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे त्याचा बंदोबस्त करावा ह्या बाबी पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणल्या. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे, राज्य सचिव अनिल केंगार, संपर्क प्रमुख नागेश भोसले, लासुर्णे ग्रामपंचायत सदस्य संतोष पिपा लोंढे,लासुर्णे ग्रामपंचायत सदस्य दिपक लोंढे, तालुका अध्यक्ष अजय फले, शिष्टाचार समितीचे मिलिंद भोसले, अक्षय फले, विनोद मिसाळ, अनिकेत वाघंबरे, बबलु सोनवणे,नाना जाधव, प्रथमेश खरात, बजाज फायनान्स चे ऋतुज वनसाळे, चैतन्य बनसोडे, किरण गायकवाड किशोर तुपे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.