Breaking News
२२ ऑगस्ट २०२२
बेलवाडी येथील सामुदायिक अत्याचाराची "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेने घेतली दखल
प्रतिनिधी : संतोष कदम.
:- ( ता. इंदापूर ) शनिवार दि.२० ऑगस्ट २०२२ रोजी बेलवाडी गावात अल्पवयीन मागासवर्गीय मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली.
याची दखल "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेने घेतली असुन सर्वच्या सर्व आरोपी लवकरात लवकर न पकडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवार दि.२२ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ११:१५ वाजता वालचंदनगर पोलीस स्टेशन वर जाऊन दिला. यावेळी निवेदन देताना वालचंदनगर पोलीस प्रशासनाचे psi मिलिंद मिठ्ठापल्ली, ठाणे अंमलदार ठोंबरे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे हा खटला जलदगती न्यायालयात चालवुन पिडीत मागासवर्गीय मुलीला न्याय देण्यात यावा. बेलवाडी गावात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे त्याचा बंदोबस्त करावा ह्या बाबी पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणल्या.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे, राज्य सचिव अनिल केंगार, संपर्क प्रमुख नागेश भोसले, लासुर्णे ग्रामपंचायत सदस्य संतोष पिपा लोंढे,लासुर्णे ग्रामपंचायत सदस्य दिपक लोंढे, तालुका अध्यक्ष अजय फले, शिष्टाचार समितीचे मिलिंद भोसले, अक्षय फले, विनोद मिसाळ, अनिकेत वाघंबरे, बबलु सोनवणे,नाना जाधव, प्रथमेश खरात, बजाज फायनान्स चे ऋतुज वनसाळे, चैतन्य बनसोडे, किरण गायकवाड किशोर तुपे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा