स्कूल चले हम... गटारीच्या पाण्यातून काय रस्ता ,काय गटार, काय घाणी घान, काय शाळा अन् काय ग्रामपंचायतीचा कारभार.. सगळं not okkk हाय...
जुनोनी / गणेश कांबळे:
सांगोला तालुक्यातील जूनोनी येथील प्राथमिक शाळेला जाणाऱ्या रस्त्यावर मागील पंधरा वर्षापासून साचतय गटारीतील पाणी. सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा अभाव असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. गटारातील दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच विद्यार्थी रोज शाळेला ये जा करत आहेत. विशेष म्हणजे अंगणवाडीच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावरच गटारीतील पाणी साचत आहे. त्यामुळे डास व दुर्गंधी पसरली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानी पोहचत आहे.
या शाळेचा एकूण पट 370 आहे. ज्या रस्त्यावर गटारितील दुर्गंधीयुक्त पाणी साचतय त्या रस्त्यावरून 40 टक्के विद्यार्थी रोज ये जा करत आहेत. शाळेचा परिसर एवढा गलिच्छ आहे. ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी करून दाखल घेतली जात नाही.
याच प्राथमिक शाळेत शिकलेले अनेकजण आज आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य आहेत .मात्र लोकप्रतिनिधींना या समस्येचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानी पोहचत आहे ,त्यामुळे जुनोनी ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थी, पालक वर्ग व ग्रामस्थांकडून केली जात आहे. जेणेकरुन विद्यार्थ्या च्या आरोग्यास हानि पोहचणार नाही आणि शाळेला जाण्याचा मार्ग सुखकर होईल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत