Breaking News

कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन...


 
नाझरे प्रतिनिधी 

      श्री गुरु मूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे मठाधिपती यांच्या आशीर्वादाने व श्री श्री श्री 108 रुद्र पशुपती कोळेकर महाराज 31 वेळ मठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी आठ वाजता कोळे मठातून ता. सांगोला, कोळे ते शिखर शिंगणापूर या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

    सदर दिंडीमध्ये सौ रेखाताई शिंदे सोमेश्वर देवस्थान हातीद, वीरभद्र देवस्थान नाझरे, रुद्र पशुपती भक्त मंडळ जवळा व श्री रुद्र पशुपती भक्त मंडळ केमवाडी या दिंड्या सामील होणार आहेत. तसेच गुरुमुर्ती निर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महाराज 31सावे मठाधिपती हे पायी चालत निघणार आहेत तरी शिवभक्तांनी गुरु सहवासाचा व शिवचंतनाचा लाभ घ्यावा व कोळेमटात मंगळवार 24 मार्च रोजी रात्री हजर राहावे असे आवाहन वीरशैव समाज, यात्रा कमिटी कोळे, मठाचे चेअरमन यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत