चिणके येथील उद्योजक गणपत कवठेकर यांचे निधन..
नाझरे प्रतिनिधी
चिनके ता. सांगोला येथील उद्योजक गणपत मसु कवठेकर यांचे बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता वर्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्युप्रसंगी त्यांचे वय वर्षे 87 होते. मा सरपंच बाळासो, ग्राम. सदस्य तानाजी, उद्योजक विठ्ठल व शिवाजी कवठेकर यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता चिनके येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत