Breaking News

वालचंद नगर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वालचंद नगर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१० फेब्रुवारी २०२५

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे यांना सीबीएस मराठी न्यूज चा राज्यस्तरीय समाजसेवारत्न पुरस्कार प्रदान...

 

प्रतिनिधी , संतोष कदम.

वालचंदनगर :- सीबीएस न्यूज मराठी चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त दि.02 फेब्रुवारी 2025 रोजी सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वालचंदनगर, ता.इंदापूर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रसिध्द लेखक, कवी, सुभाष वाघमारे यांना समाजसेवारत्न जीवन गौरव हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण समारंभ आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, डिजीटल मिडिया संपादक, पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, सुप्रसिध्द ग्रामीण कथाकार आप्पासाहेब खोत, सीबीएस न्यूज मराठी चॅनलचे सर्वेसर्वा चाँदभाई शेख यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पुरस्कार स्विकारताना सुभाष वाघमारे, वालचंदनगरच्या आदर्श माजी आदर्श सरपंच सौ.सुषमा सुभाष वाघमारे, देविदास वाघमारे, अ‍ॅड. नितीन वाघमारे, शेवंता कसबे, विनोद चंदनशिवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कवी सुभाष वाघमारे यांचा “बुचाची फुले’’ हा ग्रामीण कथासंग्रह सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार आप्पासाहेब खोत यांना भेट देण्यात आला.




०७ फेब्रुवारी २०२५

श्री .वर्धमान विद्यालयामध्ये माता रमाई जयंती निमित्त फलक लेखनातून अभिवादन...


प्रतिनिधी , संतोष कदम.

वालचंदनगर  :-  श्री. वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वालचंदनगर मध्ये माता रमाई यांची जयंती कला शिक्षक श्री. अतुल अभिमन्यू गायकवाड सर व कलेची आवड आसणारे विद्यार्थी यांच्या समवेत फलक लेखन करून साजरी केली.



०४ फेब्रुवारी २०२५

वालचंदनगर पाठशाळा क्र. ३ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न....


 प्रतिनिधी , संतोष कदम.

वालचंदनगर :-  वालचंदनगर पाठशाळा क्र .३ येथे पहिली ते चौथीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. मंथन ,कला, वकृत्व यामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी मयुरेश मेटकरी इंटरनॅशनल योगा बुक ऑफ रेकॉर्डसाठी तब्बल 2 तास 33 मिनिटे मकरासन हे आसन करून नवीन इतिहास रचून आंतरराष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा  मयुरेश मेटकरी याचा  ही विशेष गुणगौरव करण्यात आला.

यावेळी शाळा समिती अध्यक्ष श्री. मकरंद वाघ, उपाध्यक्ष श्री. महामुनी, शाळा समिती सचिव व श्री. वर्धमान विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. कुंभारसर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विशाल पाटील सर ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया वाघमारे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीस देण्यात आली.

यावेळी शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. वाघ साहेब ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री. विशाल पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पाटमास बी.आर यांनी केले.

यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.

कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात विश्वास महोत्सव स्नेहसंमेलन संपन्न....


प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर :-  इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता.इंदापूर महाविद्यालयात विश्वास महोत्सव स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. विश्वास महोत्सव स्नेहसंमेलनाचे उद्घाटन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी स्नेहसंमेलनाला क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुभेच्छा देत स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी महाविद्यालयात  विविध कला गुणदर्शन सादर करण्याची संधी विश्वास महोत्सवांमधून मिळत असल्याचे सांगितले. संस्थेने माझ्यासाठी खूप केले आहे ते मी विसरणार नाही असे सांगत जीवनात आनंद द्यायचा व घ्यायचा असतो.विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये खेळामध्ये भाग घ्यायचा असतो .आयुष्यात शेवटी काय असते, हसत खेळत राहायचे,कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नसल्याचे सांगत इच्छाशक्ती प्रबळ ठेवून आयुष्यातील न्यूनगंड दूर सारून यशस्वीपणे वाटचाल केल्यास जीवनात यश मिळत असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले. जीवनात कष्ट, मेहनत, घाम गाळल्याशिवाय कोणती गोष्ट मिळत नसल्याचे सांगत जादूची कांडी फिरवल्यासारखे यश लगेच मिळत नसल्याचे सांगितले. आयुष्यात पुढे जायचे असेल तर प्रबळ इच्छाशक्ती शिवाय आयुष्यातील यशस्वी मार्ग सापडत नसल्याचे तर न्यूनगंड दूर ठेवून जीवनातील काटे ,संकटे दूर करून आयुष्याला यशस्वीपणे वाटचाल करता येत असल्याचे सांगितले. आपल्या संस्थेचा व महाविद्यालयातील प्राध्यापकांचा तसेच आपल्या आई-वडिलांचा नेहमी मान ठेवला पाहिजे त्यांची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे असे मत भरणे यांनी व्यक्त केले. तसेच संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांना शब्द दिला की, मी नेहमी तुमच्या पाठीशी असतोच पण भैय्या तुम्ही पण तेवढ्याच विश्वासाने माझ्या पाठीशी आहात याचा मला अभिमान आहे. असे मत कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. 
 संस्थेच्या माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयातील विद्यार्थिनी यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान होणे ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांमुळेच आपणाला प्रेरणा मिळत असून आजही मी स्वतःला विद्यार्थी समजत असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले. महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल होत असताना महाविद्यालयासाठी बंदिस्त प्रेक्षाग्रहासाठी एक कोटी निधी मंजूर करणार असल्याची घोषणा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.स्वर्गीय विश्वास दादा रणसिंग व स्वर्गीय आण्णासाहेब हेगडे यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून त्यांची दुसरी पिढी यशस्वीपणे संस्था चालवत असल्याचे सांगितले.संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांनी संस्था व रणसिंग कुटुंब शेवटचा श्वास असेपर्यंत भरणे मामा तुमच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही दिली. 
यावेळी ‌मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते माध्यमिक विद्यालय म्हसोबाची वाडी विद्यालयाच्या हॉलीबॉल संघाने खासदार चषक मिळवल्याबद्दल विद्यार्थी व पालकांचा सन्मान मंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
राष्ट्रीय खेळाडू स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनी काजल जाधव हीचा सन्मान मंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे, शंकरराव रणसिंग राही रणसिंग ,प्राचार्य विजय केसकर ,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग , स्नेहसंमेलन अध्यक्ष राजेंद्रकुमार डांगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख विद्या गुळीग,क्रीडा संचालक सुहास भैरट,श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक अभिजीत रणवरे, वालचंद विद्यालय प्राचार्य सुरेश अर्जुन,मुख्याध्यापक प्रमोद भोंग,मुख्याध्यापिका मंगल सूर्यवंशी,निमसाखर सरपंच धैर्यशील रणवरे, कुरवली सरपंच राहुल चव्हाण,चिखली सरपंच उत्तम खोमणे,पोलीस पाटील विलास कणसे,पंचायत समिती माजी सदस्य सुहास डोंबाळे ,किसनराव पोळ,ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे,संदीप पाटील आदी व कुरवली,चिखली,कळंब,वालचंदनगर ,रणगाव ,निमसाखर , निरवांगी परिसरातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिजीत शिंगाडे आणि प्रा.कपिल कांबळे यांनी केले.

१० ऑक्टोबर २०२३

वालचंदनगर पाठशाळा क्र.३ च्या मुख्याध्यापिका विजया सायमन वाघमारे यांना जिल्हास्तरीय मुख्याध्यापक २०२३ पुरस्काराने सन्मानित...


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित प्राथमिक शिक्षण विभागातील वालचंदनगर पाठशाळा क्रमांक 3 च्या मुख्याध्यापिका सौ.  विजया सायमन वाघमारे यांना महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती पुणे जिल्हा यांचा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 2023 चा शिक्षक आमदार मा.श्री. विक्रम काळे साहेब व मा.श्री. जयंत आसगावकर साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

तसेच या पुरस्काराबद्दल  वालचंदनगर शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री. मकरंद वाघ साहेब, उपाध्यक्ष मा.श्री.प्रशांत महामुनी साहेब, सचिव मा.श्री. कुंभार सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी मुख्याध्यापिका सौ. विजया सायमन वाघमारे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

१० डिसेंबर २०२२

मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवेदन...


 प्रतिनिधी - संतोष कदम.

    वालचंद नगर :- ( ता. इंदापूर ) आज शनिवार दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता मा.देवेंद्र फडणवीस( गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य.) यांच्या नावाने वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशन चे इन्चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम सांळुखे यांच्या कडे मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेने निवेदन सुपुर्द केले.

      ‌ या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनी आपल्या मंत्रीमंडळातील व पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांनी या देशाचे क्रांतीसुर्य महात्मा फुले, संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,  शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करून समस्त देशाच्या भावना दुखावल्या असुन त्यांची

१) महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करावी.

२) जबाबदार म्हणून तुम्ही व बेजबाबदार म्हणून त्यांनी माफी मागावी

३) ॲट्रोसिटी ॲक्ट कलमान्वये चंद्रकांत पाटील यांच्या वर गुन्हा नोंदवावा. 

          अशी मागणी केली आहे.

                      तसेच अशा मनोवृत्ती चे लोक महाराष्ट्रासाठी धोकादायक असुन त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.

                 यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे संघटनेचे सचिव अनिल केंगार संघटनेचे संपर्क प्रमुख नागेश भोसले, लासुर्णे ग्रामपंचायत सदस्य संतोष पिपा लोंढे, संघटनेचे तालुका महिला अध्यक्ष अनिता कांबळे,  सामाजिक कार्यकर्ते शेखरभाऊ काटे, क्षितीज वनसाळे,भोला गायकवाड, रोहीत सोनवणे, रवि लोंढे, बापु तुपे,  मंदाताई धाकतोडे हे उपस्थित होते.

११ सप्टेंबर २०२२

वालचंदनगर येथे बहुजन समाज पार्टीची आढावा बैठक संपन्न..

प्रतिनिधी / संतोष कदम.
वालचंद नगर :- बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेच्या वतीने बहुजन नायक मान्यवर काशीरामजी साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आणि आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन आज दिनांक 11/9/ 2022 रोजी सकाळी 11 वाजता वालचंदनगर या ठिकाणी केले होते. या बैठकीस मार्गदर्शक म्हणून बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माननीय अजितजी ठोकळे साहेब पुणे जिल्हाध्यक्ष रमेशआप्पा गायकवाड साहेब जिल्हा कोषाध्यक्ष श्रीपती दादा चव्हाण हे उपस्थित होते . ‌बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर या देशांमध्ये बहुजन समाजाच्या आंदोलनाची एक दिशा ठरवली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय सत्ता ही मास्टर चावी असून ती हस्तगत केल्याशिवाय दलित बहुजन मागासवर्गीयांचे समस्या सुटणार नाही. या बाबासाहेबांच्या आदेशाला प्रमाण मानून बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून देशभरामध्ये बहुजन समाज जागृत केला आणि बहुजन समाज पार्टीला देशातली तिसऱ्या नंबरची पार्टी बनवली ऋषीमुनींच्या धरतीवरती उत्तर प्रदेशांमध्ये निळा झेंडा आणि हत्ती निशाणीचे चार चार वेळा सरकार बनवून दलित मागासवर्गीय बहुजन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या महामानवाचा स्मृतिदिन 9 ऑक्टोबरला असून त्या स्मृतिदिन साजरा करण्यासाठी बहुजन समाज पार्टी द्वारे कार्यक्रमाचे नियोजन केले गेले त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी बहुजन समाज पार्टीचे लोकसभा प्रभारी प्रदीप साबळे ,विधानसभा अध्यक्ष संतोषजी सवाने ,उपाध्यक्ष मनेश कांबळे ,कोषाध्यक्ष आनंद फडतरे, बाबासाहेब सावंत ,डॉ. प्रफुल्ल लोंढे, संकेत वाघमारे, बाळासाहेब सवाने ,महिला कार्यकर्त्या ज्योती मोकळ व सर्व विधानसभेचे पदाधिकारी कार्यकर्ता हितचिंतक सदर बैठकीस उपस्थित होते.