Breaking News

य. मंगेवाडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
य. मंगेवाडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१६ फेब्रुवारी २०२५

पायोनियर स्कूल य.मंगेवाडी मध्ये दहावी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न ...


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

           खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर पब्लिक (CBSE) स्कूल पायोनियर इंग्लिश सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल व पायोनियर निवासी गुरुकुल य.मंगेवाडी मध्ये शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता.


       पायोनियर स्कूल ची दरवर्षीची शुभेच्छा समारंभ म्हणजेच निरोप समारंभाची अशी परंपरा आहे की इयत्ता ९ विच्या विद्यार्थ्यांनी १० वी चा निरोप समारंभ करायचा. पण या वर्षी इयत्ता ९ विच्या विद्यार्थ्यांनी दहावीचा निरोप समारंभ असा सादर केला आहे की जणू असे वाटतं होते की एखादे मोठे कार्य आहे. ९ वी च्या विद्यार्थ्यांचे कौतुक जितके करावे तेवढे कमीच आहे. आणि त्याच बरोबर त्यांच्या वर्गशिक्षकांचे ही.अँड गजानन भाकरे साहेब हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानातून खूप सकारात्मक गोष्टी ऐकण्यास मिळाल्या.अभ्यासाबरोबरच आयुष्य जगताना काही अडचणी येतात त्यावर कशी मात करायची,  प्रत्येक माणूस वाईट नसतो त्याचा काळ वाईट असतो अशा परिस्थितीत त्या माणसाला कसे समजावून घ्यायचे असे अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. 

  Ad  

 संस्थापक अध्यक्ष श्री.अनिल येलपले सर यांनी  सुद्धा मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले व मुलांच्या मनात एवढा आत्मविश्वास निर्माण केला की ही माझ्या शाळेतील मुले नक्की सांगोला तालुक्यात चमकणार असे बोलून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पायोनियर पब्लिक स्कूल चे प्राचार्य श्री. देवमारे सर यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. परीक्षेचे भीती मनातून काढत त्यांनी बोर्ड परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.तसेच दहावी ला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांनी ही  विद्यार्थ्यांशी कशी नाळ जुळली, त्यांच्या बरोबर गेलेले क्षण, अभ्यास या विषयी गप्पा रामल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचा पायोनियर शाळेतील बारा वर्षाचा प्रवास कसा झाला. आम्ही येताना रडत आलो न जातानाही रडत जाणार पण आयुष्याची जी शिदोरी या सर्व शिक्षकांनी दिली आज ति सोबत घेऊन जाणार व खूप यशस्वी होऊन दाखवणार अशी मनोगते विद्यार्थ्यांनी मांडली. निरोप समारंभ हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप नव्हता तर एक शुभेच्छा समारंभ होता त्यातून त्यांना दहावीच्या परीक्षेसाठी प्रेरणा दिली अशी भावना सर्व विद्यार्थ्यांची होती.नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना केक कापून व भोजन देऊन त्यांचा समारंभ गोड केला.

Ad

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व  इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

०९ फेब्रुवारी २०२५

पायोनियर निवासी गुरुकुल स्कूल य. मंगेवाडी चे NMMS परिक्षेत उत्तुंग यश....

 

   सांगोला गौरव न्यूज नेटवर्क  :

   खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर सेमी इंग्लिश स्कूल आणि पायोनियर निवासी गुरुकुल य. मंगेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी NMMS परिक्षेत घवघवीत यश संपादन करून १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

       महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत २२ डिसेंबर २०२४ रोजी आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना  (NMMS )परिक्षेत एकूण १३ विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवून पायोनियर  गुरुकुलच्या स्पर्धा परीक्षेतील उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

     या परिक्षेत निवास सुभाष चौगुले , नेहा बाळकृष्ण मासाळ ,सिमरन प्रविण येलपले , प्रथमेश सुभाष आलदर, प्रतिक्षा प्रभाकर आलदर,आयुष प्रविण गेंड, समृध्दी राहुल येलपले ,अनुष्का तानाजी केंगार , श्रीधर आप्पा भोसले , श्रवण पांडुरंग शेजाळ , श्वेता गणेश सुर्यवंशी , मंथन सुशांत बेंद्रे , परिक्षीत परमेश्वर केंगार हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

       पायोनियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

            यशस्वी विद्यार्थांना  पायोनियर गुरुकुल चे संस्थापक अध्यक्ष श्री.अनिल येलपले सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख  आशुतोष रुपनर सर , बाबर सर, घाडगे मिस , पिसे सर व इतर सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

०४ फेब्रुवारी २०२५

पायोनियर स्कूल य. मंगेवाडी मध्ये इ.१० वी साठी मराठी व समाजशास्त्र विषयाचे गेस्ट लेक्चर संपन्न....


 
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर पब्लिक (CBSE) स्कूल, पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि पायोनियर निवासी गुरुकुल य. मंगेवाडी मध्ये समाजशास्त्र तज्ञ शिक्षक श्री. निवास येलपले सर आणि मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक श्री रमेश येलपले सर यांच्या गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते.

     दि.१ फेब्रुवारी रोजी समाजशास्त्र विषय अध्यापनाचा २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व २० दहावी बोर्ड परीक्षक व ५ वर्षे मॉडरेटर चा अनुभव असणारे श्री.निवास येलपले सरांनी विद्यार्थांना समाजशास्त्र विषयाचे विस्तृत ज्ञान दिले. बोर्ड पेपरचे स्वरूप कसे असते?पेपर कसा सोडवावा तसेच पेपर सोडवताना वेळेचे नियोजन कसे करावे याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून समाजशास्त्र विषयाच्या अभ्यास पद्धती समजावून सांगितल्या. तसेच काही उदाहरणे समजावून सांगितली. विद्यार्थांना समाजशास्त्र विषयाची भीती दूर होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स देऊन विस्तृत मार्गदर्शन केले.

     दि.२ फेब्रुवारी रोजी  मराठी  विषयाचे तज्ञ शिक्षक व गेली ५ वर्षे दहावी बोर्ड साठी मॉडरेटर म्हणून काम पाहणारे श्री.रमेश येलपले सरांचे मराठीचे गेस्ट लेक्चर पार पडले. यावेळी सरांनी मराठी गद्य ,पद्य , मराठी साहित्य व मराठी व्याकरण यांचा अभ्यास कसा करावा यांच्या टिप्स देऊन मराठी विषयाचे विस्तृत ज्ञान देऊन विद्यार्थांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून सांगितले. 

         श्री.निवास येलपले सर व श्री.रमेश येलपले सर यांनी गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून  विद्यार्थांना सखोल मार्गदर्शन करून दहावी बोर्ड पेपर सोडवताना वेळेचे नियोजन कसे करावे हे सांगून उत्कृष्ट पेपर कसा लिहावा हे सांगून बोर्ड परीक्षेची भीती दूर करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला.

       या गेस्ट लेक्चर चे आयोजन प्राचार्य श्री.अनिल येलपले सर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विषय शिक्षक श्री. आशुतोष रूपनर सर आणि मराठी विषय शिक्षिका सौ.स्वाती म्हेत्रे मॅडम व इतर सहकारी शिक्षकांनी केले होते.

०७ जानेवारी २०२५

पायोनियर शैक्षणिक संकुल य. मंगेवाडी मध्ये पत्रकार दिन विविध उपक्रमांनी साजरा....... पत्रकारांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव

 


सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर पब्लिक ( CBSE) स्कूल, पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूल व पायोनियर निवासी गुरुकुल य.मंगेवाडी मध्ये पत्रकार दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

       लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकारांच्या  कार्याचे कौतुक म्हणून जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.  यावेळी सांगोला तालुक्यातील व जिल्ह्यातील संपादक तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       पायोनियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पत्रकारांना प्रश्न विचारले व त्याची विस्तृतपणे उत्तरे पत्रकारांनी दिली.  

            याप्रसंगी

     संपादक सतीश सावंत , पत्रकार सचिन भुसे , पत्रकार किशोर म्हमाणे , पत्रकार रविराज शेटे ,पत्रकार चांद भैया शेख , पत्रकार विनोद चंदनशिवे , पत्रकार विकास वाघमारे , पत्रकार जगदीश कुलकर्णी , पत्रकार रोहित सुर्यागण , पत्रकार दत्तात्रय पवार , पत्रकार सिद्धेश्वर माने , पत्रकार दिलीप घुले ,पत्रकार संजय माने , पत्रकार सचिन धांडोरे , पत्रकार अतुल फसाले , पत्रकार शशिकांत कोळी , पत्रकार बालाजी केदार , पत्रकार राहुल गायकवाड ,  पत्रकार आदिनाथ धनवडे, पत्रकार शरद शिंदे , पत्रकार समाधान धांडोरे ,  पत्रकार संतोष येडगे. आदी पत्रकार बंधूना शाल ,श्रीफळ , पुष्पगुच्छ ,  सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान केला.

       पत्रकार दिन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर , पायोनियर पब्लिक स्कूल चे प्राचार्य सतीश देवमारे सर , सर्व विभाग प्रमुख , सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी ,  यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  व आभार प्रदर्शन माध्यमिक विभाग प्रमुख आशुतोष रूपनर  यांनी केले. यावेळी विद्यार्थी , पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.