सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर पब्लिक (CBSE) स्कूल पायोनियर इंग्लिश सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल व पायोनियर निवासी गुरुकुल य.मंगेवाडी मध्ये शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
पायोनियर स्कूल ची दरवर्षीची शुभेच्छा समारंभ म्हणजेच निरोप समारंभाची अशी परंपरा आहे की इयत्ता ९ विच्या विद्यार्थ्यांनी १० वी चा निरोप समारंभ करायचा. पण या वर्षी इयत्ता ९ विच्या विद्यार्थ्यांनी दहावीचा निरोप समारंभ असा सादर केला आहे की जणू असे वाटतं होते की एखादे मोठे कार्य आहे. ९ वी च्या विद्यार्थ्यांचे कौतुक जितके करावे तेवढे कमीच आहे. आणि त्याच बरोबर त्यांच्या वर्गशिक्षकांचे ही.अँड गजानन भाकरे साहेब हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानातून खूप सकारात्मक गोष्टी ऐकण्यास मिळाल्या.अभ्यासाबरोबरच आयुष्य जगताना काही अडचणी येतात त्यावर कशी मात करायची, प्रत्येक माणूस वाईट नसतो त्याचा काळ वाईट असतो अशा परिस्थितीत त्या माणसाला कसे समजावून घ्यायचे असे अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या.
Ad
संस्थापक अध्यक्ष श्री.अनिल येलपले सर यांनी सुद्धा मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले व मुलांच्या मनात एवढा आत्मविश्वास निर्माण केला की ही माझ्या शाळेतील मुले नक्की सांगोला तालुक्यात चमकणार असे बोलून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पायोनियर पब्लिक स्कूल चे प्राचार्य श्री. देवमारे सर यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. परीक्षेचे भीती मनातून काढत त्यांनी बोर्ड परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.तसेच दहावी ला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांनी ही विद्यार्थ्यांशी कशी नाळ जुळली, त्यांच्या बरोबर गेलेले क्षण, अभ्यास या विषयी गप्पा रामल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचा पायोनियर शाळेतील बारा वर्षाचा प्रवास कसा झाला. आम्ही येताना रडत आलो न जातानाही रडत जाणार पण आयुष्याची जी शिदोरी या सर्व शिक्षकांनी दिली आज ति सोबत घेऊन जाणार व खूप यशस्वी होऊन दाखवणार अशी मनोगते विद्यार्थ्यांनी मांडली. निरोप समारंभ हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप नव्हता तर एक शुभेच्छा समारंभ होता त्यातून त्यांना दहावीच्या परीक्षेसाठी प्रेरणा दिली अशी भावना सर्व विद्यार्थ्यांची होती.नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना केक कापून व भोजन देऊन त्यांचा समारंभ गोड केला.
Ad
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा