Breaking News

पंढरपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पंढरपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२८ फेब्रुवारी २०२५

सात दिवसाच्या आत गतिरोधक बसवा अन्यथा आमरण उपोषण करणार...... मोहन भोसले..

 


पंढरपूर प्रतिनिधी: डॉ अमोल उबाळे

पंढरपूर सातारा हा रोड राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या अन् वर्दळ वाढली आहे.सदर रोड लगतच रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल ऑफ सायन्स हे महाविद्यालय व जि. प. प्रा. शाळा आहे.सदर वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे विद्यार्थी व सर्व सामान्य नागरिकांसोबतच तरुणांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.यावरती आळा बसावा म्हणून बस स्टँड परिसर, महिम चौक (चौफळा), व जि. प. प्रा. शाळेच्या गेट समोर (चौगुलेवाडी रोड) वरती रंबल स्पीड ब्रेकर बसवून मिळावेत यासाठी एम एस आर डी सी च्या अधीक्षक अभियंता, पालक मंत्री जयकुमार भाऊ गोरे,जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उप विभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी पंढरपूर, तहसीलदार पंढरपूर, पत्रकार सेवा संघ पंढरपूर विभाग, ग्रामपंचायत भाळवणी यांना पत्र व्यवहार केला आहे. तसेच पंढरपूर पंचायत समितीच्या आमसभेत हा विषय मांडला असता आ.श्री. अभिजीत आबा पाटील, आ. श्री. समाधान दादा आवताडे, आ. श्री. राजू खरे, आ. श्री. बाबासाहेब देशमुख, मा. श्री. संभाजीराजे शिंदे यांनी हा विषय आमसभेच्या प्रोसीडिंग वर घेवून त्वरित मार्गी लावण्यासाठी शब्द दिला आहे.. एवढे करूनही भाळवणी ग्रामस्थांना दि.०७/०३/२५ पर्यंत न्याय न मिळाल्यास मी मोहन इंद्रजीत भोसले दि.१०/०३/२५ पासून न्याय मिळेपर्यंत मारुती मंदीर भाळवणी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे असे लेखी निवेदन संबंधीत कार्यालयांना दिले आहे...



०५ जानेवारी २०२५

भाळवणी गावचे सुपुत्र डॉ.अरुण भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.


 

पंढरपूर प्रतिनिधी: अमोल उबाळे

भाळवणी ता पंढरपूर येथील दया सामाजिक संस्थेचे संस्थापक डॉ. अरुण भगवान भोसले साहेब यांची केळी संशोधन केंद्र जळगाव येथे सहयोगी प्राध्यापक व इन्चार्ज पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शैक्षणिक ,सामाजिक ,पारिवारिक व राजकीय स्तरातून कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे 

काल रविवार दिनांक  5 जानेवारी 2025 रोजी त्यांना भाळवणी येथे बोलवून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी दया बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष श्री जालिंदर गायकवाड व सचिव श्री मारुती भोसले भाऊसाहेब व श्री पवन सातपुते, तसेच भिमज्योत तरुण मंडळाचे पदाधिकारी श्री मोहन भोसले ,श्री युवराज उबाळे ,श्री लक्ष्मण गायकवाड ,श्री बाबासाहेब गायकवाड , श्री दादा गायकवाड ,श्री नाथा भोसले ,श्री नामदेव गायकवाड ,श्री धनाजी गायकवाड ,श्री सागर भोसले, श्री सचिन गायकवाड ,श्री अर्जुन माने, श्री सोमनाथ गायकवाड ,श्री जिगर गायकवाड , निखिल भोसले, राजदीप गायकवाड व शिलधन  भोसले  तसेच आर पी आय तालुका उपाध्यक्ष सचिन कुमार भोसले हे उपस्थित होते 

     त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य आहे  त्यांच्याच संकल्पनेतून आकार घेतलेली दया फाउंडेशन ही संस्था गेली चार वर्ष सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवत आहे अशी माहिती पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख डॉ.अमोल उबाळे यांनी दिली.

     शेवटी डॉ.अरुण भोसले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व मुलांनी स्पर्धा परीक्षेकडे वळले पाहिजे असे सांगितले जे शैक्षणिक उपक्रम चालू आहेत ते चालू ठेवण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानून सत्कार केल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त केले.

१५ जुलै २०२४

वाडी कुरवली ता पंढरपूर येथे Indus टावर्सचे आणि B4s solution Pvt अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये महाप्रसादाचे वाटप....


 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

सोमवार दि १५ जुलै रोजी आषाढी वारीचे औचित्य साधून देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन वाडी कुरवली तालुका पंढरपूर येथे दुपारी बारा वाजता झाले आणि त्याच ठिकाणी  इंडस टावर्स चे सोलापूर जिल्ह्याचे एरिया ऑपरेशनल मॅनेजर श्री रामेश्वर भोसले आणि सांगोला मंगळवेढा आणि पंढरपूर विभागाचे फिल्ड सपोर्ट इंजिनियर श्री पवन कुमार मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्याची संधी मिळाली 

सदर पालखीच्या सोबत लाखोंच्या संख्येने भक्तगण पायी चालत पंढरपूरकडे प्रस्थान करीत होते क्षणभर विश्रांती घेऊन हरिनामाचा जागर करत पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली

यामध्ये सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर या परिक्षेत्राची मोबाईल नेटवर्कची धुरा सांभाळणारे कर्तव्यदक्ष तंत्रज्ञ दत्तात्रय लोखंडे, यशवंत जगधने , भारत कोळेकर, दादासाहेब जगदाळे ,शंकर कदम ,सुरज जाधव ,अतुल पाटील ,समाधान धांडोरे, सुरक्षारक्षक मारुती शिंदे आणि वाडी कुरवली चे प्रतिष्ठीत नागरीक विनायक काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते 


सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन अतुल पाटील यांनी पाहिले

१९ नोव्हेंबर २०२३

भाळवणी ता पंढरपूर येथील डॉक्टर आंबेडकर युथ असोसिएशन या सामाजिक संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न.....


 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

भिमनगर, भाळवणी येथे  प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी  गुरुवार दि.16/11/2023 रोजी ”डॉक्टर  आंबेडकर युथ असोसिएशन (DAYA)” भाळवणी या सामाजिक संघटनेच्या वतीने विविध प्रकारच्या शैक्षणीक, क्रीडा तसेच शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी समाजातील मुलांमध्ये अभ्यासाची गोडी तसेच  निकोप शैक्षणिक स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे या उदात्त हेतूने ”तक्षशिला अभ्यासिकेचे” उद्घाटन DAYA ग्रूप चे सन्माननीय सदस्य पशु वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ.शाहीर गायकवाड व सौ. निता नंदकुमार उबाळे  यांच्या हस्ते करण्यात आले. 



        त्याप्रस़गी महिलांची उपस्थिती प्रेक्षणीय होती. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान DAYA ग्रूप चे अध्यक्ष प्रा. श्री. नंदकुमार उबाळे सर यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा मार्गदर्शक श्री. गायकवाड सर यांना पाचारण करण्यात आले होते. 

      या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे मान्यवरांचे व समाजबांधवांचे स्वागत ग्रूपचे सदस्य, ग्रामविकास अधिकारी श्री. मारुती भोसले भाऊसाहेब यांनी केले, तर  आपल्या सूत्रसंचालना मधून ग्रूपचे उपाध्यक्ष, चिंचणी आदर्श प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षक तथा बामसेफ संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. जालिंदर गायकवाड सर यांनी  बामसेफची शैक्षणिक व सामाजिक चळवळ तसेच समाजात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या जाणिव जागृतीबाबत  व दया फाऊंडेशन घ्या  कार्या विषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थितांमधून श्री. मोहन भोसले व श्री. प्रमोद भोसले यांनी दया ग्रूपच्या उपक्रमांचे विशेष कौतुक करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 



        याप्रसंगी RPI चे तालुका अध्यक्ष श्री. सचिन भोसले यांनी दया ग्रूप चे कार्य हे शिक्षणासाठी समाजाला वरदान ठरेल तसेच त्यांच्या  कार्यात कुठलीही अडचण आली तर मदत करण्याचे आश्वासन दिले.  भाळवणी ग्राम पंचायतचे विद्यमान सदस्य श्री. जिगर गायकवाड व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव श्री. मच्छिंद्र गायकवाड यांनी दया ग्रूप च्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित महिलांमधून  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या कु. पूनम भोसले हिने मुले मुली  शिकत असताना पुर्वीच्या काळी व चालू काळात येत असलेल्या अडचणी याविषयी तसेच मुलांच्या अभ्यासात पालकांची प्रामुख्याने आईची जबाबदारी यावर छान भाष्य केले. कार्यक्रमातील मुख्यभाग असलेल्या बक्षीस वितरणाची जबाबदारी ग्रूपचे सदस्य व आदर्श प्राथमिक शिक्षक श्री. पवन सातपुते सर तसेच दुसरे सदस्य श्री. समाधान गायकवाड यांनी घेतली. यावेळी मागील वर्षी आवाहन केल्यानुसार इयत्ता 5 वी ते 12 वी मध्ये वर्गात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक नंदकुमार उबाळे सरांनी ठेवलेले रोख रक्कम रु- 1000/- चे बक्षिस कु. संस्कृती पवन सातपुते हिला प्रदान करण्यात आले. तिने गतवर्षी नवोदय विद्यालय,पोखरापूर या शाळेमध्ये वर्गात पहिला क्रमांक पटकावला होता. त्याचबरोबर गावातील मातंग समाजातून वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणारा पहिला विद्यार्थी डाॅ. निखिल साठे यांचेही अभिनंदन करुन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

      प्रमुख पाहुणे श्री. नवनाथ लक्ष्मण गायकवाड सर यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व, त्यामुळे समाजाची व गावाची होणारी ओळख पटवून देताना बार्शी तालुक्यातील आगळगांव तसेच माढा तालुक्यातील अधिकार्ऱ्यांचे गांव अशी ओळख असलेल्या उपळाई गावांमधील शैक्षणिक प्रगतीविषयी उपस्थिता़ना माहिती दिली तसेच DAYA ग्रूप च्या कामाचीही स्तुती केली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार उबाळे सर यांनी आपल्या भाषणात DAYA ग्रूपच्या कार्याची पद्धत, राजकारण विरहित काम, तसेच संघटनेने गेल्या ४वर्षाच्या कामाचा आढावा घेत मुलांना समुपदेशन व पालकांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ग्रूपचे सर्व सदस्य आपले काम निस्वार्थ भावनेने, तन मन धन लावून व एकजुटीने करत असेले बद्दल समाधान व्यक्त केले व सर्वांचे तोंडभरून कौतुक केले.

     शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंढरपूर तालुका LSS संघटनेचे तालुकाध्यक्ष तसेच DAYA ग्रूप चे सदस्य डॉ. अमोल उबाळे यांनी केले. एकंदरीत हा सर्व कार्यक्रम उत्साहात व खेळी मेळी च्या वातावरणात पार पडला. 

     हा कार्यक्रम  यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी दया संघटनेतील उपस्थित सदस्यांबरोबरच सर्व श्री. प्रा. डॉ. अरुण भोसले, नवनाथ गायकवाड गुरुजी, महसूल अधिकारी विलास गायकवाड, उद्योजक दत्तात्रय ननवरे, ग्रामविकास अधिकारी वैभव गायकवाड, बॅंक मॅनेजर अमोल वाल्मिक गायकवाड, नामांकित फार्मसी कंपनीचे मॅनेजर लक्ष्मण काटे, पेंटींग उद्योजक सोमनाथ भोसले तसेच सहा.पोलिस निरिक्षक समाधान मागाडे या दुरस्थ सदस्यांचे ही सहकार्य लाभले.

१८ एप्रिल २०२३

सांगोला महावितरण मधील अशोक आलदर हे पंढरपूर येथे "नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय कामगार रत्न" या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.... .

 



सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

पंढरपूर येथे 14 एप्रिल 2023 रोजी विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता त्याचाच एक भाग म्हणून सांगोला महावितरण मधील कर्तव्यदक्ष अधिकारी  श्री अशोक आलदर यांना "नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय कामगार रत्न" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार गहिनीनाथ महाराज औसेकर पंढरपूर रुक्मिणी मंदिर सहअध्यक्ष, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील ,अभिजीत ढोबळे, डॉ बी पी रोंगे सर, आणि प्रतिष्ठान संस्थापक डी राज सर्वगोड आदी मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले



अशोक आलदर यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार, सीबीसी न्यूज चा कोविड योद्धा पुरस्कार, समाजरत्न ,प्रशासनरत्न ,कोल्हापूर येथे क्रिएटिव हॅडन्स ऑफ महाराष्ट्र ,जळगाव येथे सामाजिक सेवा ,सोलापूर येथे आदर्श कर्मचारी रत्न अशा आज पर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे सांगोला महावितरण चे उप अभियंता श्री आनंद पवार साहेब यांच्या आणि तमाम सांगोला वासियांच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे



३० ऑक्टोबर २०२२

भाळवणी येथे'दया’ संघटनेच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न....


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

 भाळवणी, ता. पंढरपूर येथील डाॅ आंबेडकर यूथ असोसिएशन ( DAYA/दया ) या संघटनेच्या वतीने समाजातील 5 वी ते 12 मधील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई - वडीलांसमवेत ट्राॅफी, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ इ. देवून सत्कार करण्यात आला. 

       यावेळी समाजातील जुन्या पिढीतील मान्यवर तसेच युवा पिढीचे प्रतिनिधी विचारमंचावर उपस्थित होते. शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी राहणाऱ्या व वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असणाऱ्या समाजातील युवकांनी कोरोनाच्या कठीण काळात एकत्र येत या संघटनेची बांधणी केली. कोरोनाच्या बिकट अवस्थेत समाजसेवेचे व्रत जोपासत काहींना आर्थिक मदत, अनेक निराधारांना अन्नधान्य वाटप इ. कार्यक्रम राबविण्यात आले होते. त्याच बरोबर समाजाची विस्कटलेली शैक्षणिक घडी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी गत शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि पालकांचा सत्कार समारंभ  करण्याची परंपरा गत दोन वर्षापासून सुरु केलेली आहे.



      त्यानुसार चालू वर्षात बारावी मध्ये प्राविण्य मिळवणारे 1) कु. सृष्टी गायकवाड - CET परीक्षेत 91 टक्के गुण मिळवून कृषी महाविद्यालय, पुणे येथे प्रवेश 2) चि. सुमीत गायकवाड - BCS प्रवेश. 

 दहावीला विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणारे 1) कु. श्रद्धा गायकवाड - 84 टक्के, 4)कु. पुनम मागाडे - 80 टक्के, 5)कु. अपर्णा गायकवाड - 75 टक्के, 6)कु. क्षितिजा गायकवाड - 74 टक्के, 7) पुरुषोत्तम भोसले - 72 टक्के, 8)अनुष्का भोसले - 98 टक्के शाहू काॅलेज, लातूर येथे प्रवेश, 9)शुभम गायकवाड, 10)कु.वृषाली गायकवाड 

 तसेच इतर विद्यार्थ्यांमध्ये 1) कु. संस्कृती सातपुते - नवोदय विद्यालय पोखरापूर येथे प्रवेश, 2) कु. रचना सातपुते - राज्यस्तरीय बुद्धिवंत स्पर्धेत द्वितीय क्रमांक, 3)सुमित भोसले - गांधी विचार फोरम परिक्षेत प्रथम, 4) कु. ज्ञानेश्वरी गायकवाड - नॅशनल स्पेलथाॅन परीक्षेत गोल्ड मेडल, 5) किर्तीरत्न उबाळे - NMMS शिष्यवृत्तीस पात्र, 6)कु.यशश्री गायकवाड - नॅशनल आॅलंपियाड मॅथ्स, सिल्व्हर मेडल, त्याचप्रमाणे इतर कोर्सेसमध्ये नर्सिंगला प्रवेश मिळाल्या बद्दल 1)कु. ऋतुजा गायकवाड, 2)कु. वैष्णवी गायकवाड तसेच डी. फार्मसी प्रवेशाबद्दल 3)कु. शिल्पा मागाडे. तसेच स्वकष्टातून शिक्षण घेत असल्याबद्दल 1)सुमित मारुती गायकवाड 2) ऋत्विक धनाजी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

    त्याचप्रमाणे 1) समर्थ भोसले - मंथन परिक्षेत प्रथम क्रमांक, 2) अविष्कार भोसले - ज्युनिअर सायंटिस्ट (डाॅ. होमी भाभा संस्था ) तसेच नामांकित शासकीय कृषी महाविद्यालयातून बी. एस्सी. (अॅग्री) पदवी चांगल्या गुणांनी  पुर्ण केल्याबद्दल 1) कु. कांचन भोसले, 2) राजरत्न उबाळे, 3) अंकिता उबाळे यांचा गौरव करण्यात आला.

       कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दया संघटनेचे अध्यक्ष प्रा. श्री. नंदकुमार उबाळे,(रयत शिक्षण संस्था) यांनी भूषविले.  तर प्रास्ताविकात उपाध्यक्ष श्री. जालिंदर गायकवाड (गुरुजी)यांनी दया संघटना निर्मितीचा उद्देश व कार्य याचा आढावा सादर केला. याप्रसंगी कार्तिक कांबळे, ज्ञानेश्वरी गायकवाड यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले तर डाॅ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. तजिल भोसले, मिलिंद कांबळे, श्री. सुखदेव गायकवाड, श्री. सचिन भोसले सौ. लक्ष्मी गायकवाड मॅडम यांनी पालक मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रा. श्री. नंदकुमार उबाळे यांनी शिक्षणामुळे होणारी आपली प्रगती व व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन करताना महात्मा जोतिबा फुले यांच्या ‘निती विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले’ या ओळींचा अर्थ विषद केला. आणि जमलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी दया संघटना आपल्या पाठीशी राहील ग्वाही दिली. 

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नवनाथ गायकवाड (गुरुजी) आणि श्री. अमोल उबाळे (पशु वैद्यक) यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव श्री. मारुती भोसले (ग्रामसेवक) यांनी मानले.

  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दया संस्थेचे मार्गदर्शक  प्रा. डाॅ. श्री. अरुण भोसले (कृषी महाविद्यालय, पुणे), प्रा. डाॅ. श्री. शाहीर गायकवाड(पशु वैद्यकीय महाविद्यालय,मुंबई ), श्री. समाधान मागाडे (सहा. पोलिस निरीक्षक), श्री. पवन सातपुते(गुरुजी), श्री. समाधान गायकवाड(परिवहन म. मंडळ), उद्योजक श्री. दत्तात्रय ननवरे, श्री. लक्ष्मण काटे (वरिष्ठ व्यवस्थापक, तिरुपती वेलनेस, फार्मा कंपनी) श्री. विलास गायकवाड (सार्व. बांधकाम विभाग) श्री. वैभव गायकवाड(ग्रामसेवक), श्री. सोमनाथ भोसले(उद्योजक), श्री. अमोल गायकवाड (बँक मॅनेजर, पंजाब बँक) यांनी परिश्रम घेतले.


२१ ऑगस्ट २०२२

एन डी एम जे संघटनेच्या वतीने तपकीर शेटफळ येथे महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव साजरा

अजनाळे: समाधान धांडोरे: काल शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी तपकिरी शेटफळ तालुका पंढरपूर येथे महाकवी वामनदादा कर्डक सुवर्ण महोत्सव जन्म शताब्दी सोहळा संपन्न झाला याप्रसंगी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस( एन डी एम जे) राज्यसचिव वैभव जी गीते साहेब जिल्हाध्यक्ष पंकज कुमार काटे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख येताळा खरबडे युवा नेते अँड रोहित एक मल्ली सांगोला तालुका अध्यक्ष समाधान धांडोरे तसेच युवा नेते सुदर्शन वाघमारे ,नवनाथ भागवत, राजकुमार भोपळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ शाहीर हरिदास कांबळे तसेच विजय कांबळे यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतील सामाजिक प्रबोधनात्मक गीते आपल्या सुमधुर आवाजात सादर केली त्यांना बजरंग साखरे यांनी उत्कृष्ट ढोलकीची साथ देत काही गाणी सादर केली या कार्यक्रम प्रसंगी राजकुमार भोपळे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड रोहित एक मल्ली यांनी केले एनडीएमजे राज्यसचिव वैभव जी गीते साहेब बोलताना म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेला संघर्ष आणि समाजाच्या व्यथा आणि दुःख हे गीत गाण्याच्या माध्यमातून परखडपणे मांडण्याचा प्रयत्न हा महाकवी वामनदादा यांनी केलेला आहे तरी आपल्या समाजातील जेष्ठ शाहिरांचा सन्मान करणे हेच खरे वामनदादांना अभिवादन ठरेल असे प्रतिपादन एन डी एम जे चे राज्यसचिव वैभव जी गीते साहेब यांनी केले मनोगत व्यक्त करतेवेळी ते बोलत होते पुढे ते म्हणाले वामनदादांचे साहित्य हे शासनामार्फत प्रकाशित केले जावे यासाठी मी स्वतः पाठपुरावा करीत आहे आणि यासाठी संघटना ही कटिबद्ध आहे
जिल्हाध्यक्ष पंकज कुमार काटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले समाजातील तळागाळातील कलाकारांना मानसन्मान देऊन चळवळ जिवंत ठेवली पाहिजे त्यांना पाठबळ देऊन त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम युवा कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे असे ते म्हणाले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख येताळा खरबडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले खेडोपाडी जाऊन शाहिरांचा सन्मान करणे यामुळे समाजामध्ये जनजागृती होईल आणि चळवळ जिवंत राहील यासाठी त्यांनी राज्य सचिव वैभवजी गीते साहेब यांचे विशेष आभार मानले