Breaking News
२१ ऑगस्ट २०२२
एन डी एम जे संघटनेच्या वतीने तपकीर शेटफळ येथे महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव साजरा
अजनाळे: समाधान धांडोरे:
काल शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी तपकिरी शेटफळ तालुका पंढरपूर येथे महाकवी वामनदादा कर्डक सुवर्ण महोत्सव जन्म शताब्दी सोहळा संपन्न झाला याप्रसंगी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस( एन डी एम जे) राज्यसचिव वैभव जी गीते साहेब जिल्हाध्यक्ष पंकज कुमार काटे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख येताळा खरबडे युवा नेते अँड रोहित एक मल्ली सांगोला तालुका अध्यक्ष समाधान धांडोरे तसेच युवा नेते सुदर्शन वाघमारे ,नवनाथ भागवत, राजकुमार भोपळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ शाहीर हरिदास कांबळे तसेच विजय कांबळे यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतील सामाजिक प्रबोधनात्मक गीते आपल्या सुमधुर आवाजात सादर केली
त्यांना बजरंग साखरे यांनी उत्कृष्ट ढोलकीची साथ देत काही गाणी सादर केली या कार्यक्रम प्रसंगी राजकुमार भोपळे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड रोहित एक मल्ली यांनी केले
एनडीएमजे राज्यसचिव वैभव जी गीते साहेब बोलताना म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेला संघर्ष आणि समाजाच्या व्यथा आणि दुःख हे गीत गाण्याच्या माध्यमातून परखडपणे मांडण्याचा प्रयत्न हा महाकवी वामनदादा यांनी केलेला आहे तरी आपल्या समाजातील जेष्ठ शाहिरांचा सन्मान करणे हेच खरे वामनदादांना अभिवादन ठरेल असे प्रतिपादन एन डी एम जे चे राज्यसचिव वैभव जी गीते साहेब यांनी केले मनोगत व्यक्त करतेवेळी ते बोलत होते
पुढे ते म्हणाले वामनदादांचे साहित्य हे शासनामार्फत प्रकाशित केले जावे यासाठी मी स्वतः पाठपुरावा करीत आहे आणि यासाठी संघटना ही कटिबद्ध आहे
जिल्हाध्यक्ष पंकज कुमार काटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले समाजातील तळागाळातील कलाकारांना मानसन्मान देऊन चळवळ जिवंत ठेवली पाहिजे त्यांना पाठबळ देऊन त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम युवा कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे असे ते म्हणाले
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख येताळा खरबडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले खेडोपाडी जाऊन शाहिरांचा सन्मान करणे यामुळे समाजामध्ये जनजागृती होईल आणि चळवळ जिवंत राहील यासाठी त्यांनी राज्य सचिव वैभवजी गीते साहेब यांचे विशेष आभार मानले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा