Breaking News

२१ ऑगस्ट २०२२

अजनाळे पंचायत समिती गणामध्ये प्रा बाळकृष्ण कोकरे यांनी केली मोर्चे बांधणीला सुरुवात; लग्न समारंभ व इतर गणातील छोट्या मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी दिला जोर...

अजनाळे: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आणखी काही महिन्यांचा कालावधी असला तरी इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटी घेण्यास जोर दिला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन अडचणी सोडवण्यास प्रयत्न चालू केले आहेत. अजनाळे पंचायत समिती गणामध्ये प्राध्यापक बाळकृष्ण कोकरे यांनी अजनाळे पंचायत समिती गणातील महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन निवडणुकांच्या आधीच राजकीय वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. प्राध्यापक बाळकृष्ण कोकरे हे स्वर्गीय आमदार भाई डॉ गणपतराव देशमुख यांची विश्वासू सहकारी म्हणून तालुक्यात त्यांची सर्वत्र ओळख आहे. कोकरे यांनी अजनाळे, य मंगेवाडी,कमलापुर,चिणके,वझरे,लिगाडेवाडी,वांटबरे या गावातील नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर दिला आहे. कोकरे यांनी पंचायत समिती गणातील लग्न समारंभ, छोटे मोठे कार्यक्रम या समारंभांना हजेरी लावून कार्यकर्त्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजनाळे पंचायत समिती गणामध्ये बाळकृष्ण कोकरे यांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे कोकरे यांच्या समर्थकांनी कोकरे यांनी निवडणूक लढवावी असा हट्टास धरला आहे.जर शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी दिल्यास निश्चितपणे अजनाळे पंचायत समिती गण लढू अशी प्रतिक्रिया सांगोला गौरव च्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांच्या समर्थकांंनी सांगीतले. त्यामुळे प्रा बाळकृष्ण कोकरे हे निवडणूक लढवणार का? हे येणाऱ्या काही महिन्यातच चित्र स्पष्ट होणार आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा