Breaking News

शैक्षणिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शैक्षणिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२० फेब्रुवारी २०२५

अभिनव पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी

 


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

अखंड हिंदुस्तानाचे दैवत,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे अजनाळे गावच्या माजी सरपंच सुजाताताई देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विलास लाडे, प्रकाश धांडोरे, संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे तसेच मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीलाच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनींच्या शिवगर्जनेने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य,पराक्रम यांची गाथा गाणाऱ्या ,त्यांच्या जीवनाचा परिचय देणाऱ्या आपल्या जोशपूर्ण मनोगतातून विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतींचा जयजयकार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी सत्तेपासून सर्वसामान्यांचा बचाव केला व हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि म्हणूनच आज आपण आपल्या राष्ट्रात सुरक्षितपणे मोकळा श्वास घेत आहोत अशा भावनांसह छत्रपती नसते तर.. अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब यांच्या वेशभूषांनी सर्वांचे  लक्ष वेधून घेतले. यावेळी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीतावर अप्रतिम असे लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. त्याचबरोबर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनीही शिवरायांवर आधारित  नृत्य सादर केले.या गीतांसाठी भारती सर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी इयत्ता आठवी मधील एन एम एम एस या परीक्षेतील पात्र विद्यार्थी, सोलापूर जिल्हा सब जुनिअर ॲथलेटिक  स्पर्धा 2025 मधील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू तसेच अजंठा आर्ट अकॅडमी अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनव स्कूल हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करत अभिनव स्कूल व्यवस्थापन व टीमचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कदम यांनी केले तर  कार्यक्रमाच्या उत्साह पूर्ण यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

पायोनियर पब्लिक स्कूल तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना


सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

      खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचालित पायोनियर पब्लिक  स्कूल  (सीबीएसई) यलमार मंगेवाडी येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिनांक १८ फेब्रुवारी  रोजी पब्लिक स्कूल मधील प्रि प्रायमरी व प्रायमरी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात विविध गावांमध्ये शिवजयंती निमित्ताने कार्यक्रम सादर केले. अनेक गावातील चौकामध्ये लेझीम ,नृत्य पोवाडे व शिवगर्जना सह विविध कार्यक्रम करण्यात आले. 

        सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थी अजनाळे या गावा मधील ग्रामपंचायती समोर कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यावेळेस गावचे सरपंच सौ अनिता पवार , ग्रामपंचायत सदस्य महादेव भंडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

       त्यानंतर बलवडी गावातील शिवछत्रपती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात सरपंच माऊली राऊत उपसरपंच रवी रविराज शिंदे मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव मोहिते उपस्थित ग्रामस्थांमध्ये  शिवाजी गायकवाड,विनायक शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, वैभव पवार ,विजय मोहिते नवनाथ शिंदे, विकास शिंदे, सुनील पवार, आप्पासाहेब शिंदे, संदीप गायकवाड असे मान्यवर उपस्थित होते. 

          नाझरे या गावामध्ये कार्यक्रम साजरीकरणाच्या वेळी सरपंच संजय सलगर उपसरपंच लोहट मॅडम, सांगोला तालुका पंचायत समिती माजी उप सभापती सुनील चौगुले व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यानंतर वाटंबरे या गावांमध्ये कार्यक्रम सादरीकरणाच्या वेळी सुभाष हॉटेलचे मालक सुभाष माळी व ग्रामस्थ उपस्थित होते. ठिक ठिकाणी सादर झालेल्या कार्यक्रमांमध्ये गावकऱ्यांनी मुलांसाठी खाऊ वाटप करून त्यांच्यातला उत्साह कायम ठेवला. विद्यार्थ्यांनी व शिक्षक वर्गांनी भगवे फेटे परिधान केले होते यामुळे विविध गाव भगवेमैय बनले होते. ठीक ठिकाणी सादर होणाऱ्या नृत्य सादरीकरण पोवाड्यामधून उलगडणारी शौर्यगाथा अन भगवे झेंडे हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम शाळेतर्फे आयोजित करण्यात आला होता. 

         या कार्यक्रमासाठी पायोनियर पब्लिक स्कूल सीबीएसई शाळेचे प्रिन्सिपल श्री सतीश देवमारे सर यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक सौ रुपाली गायकवाड सौ तनुजा टोने सौ प्रतिक्षा येलपले, सौ पूजा पवार, सौ. सारिका सावंत, सौ. रुपाली इंगवले, श्री मोहन वाघमारे यांच्या सहकार्याने  विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर गौड यांनी केले. पायोनियर शाळेचे संस्थापक माननीय श्री अनिल येलपले सर यांनी मुलांना योग्य मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या. 

      अशा प्रकारे शिवजयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला.