अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...
अजनाळे: समाधान धांडोरे :
अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय सैन्य दलात कार्यरत मेजर श्री.रमेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे व गीतांचे गायन केले. ज्युनिअर के.जी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती गीतांवर डान्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रंगभरण व वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर राज्यस्तरीय योंगमुडो स्पर्धेत गोल्ड व सिल्वर पदक प्राप्त विद्यार्थिनींचे व राज्यस्तरीय ए.टी.एस स्पर्धा परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंडलीक कोळवले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन कौतुक केले . स्व.आमदार डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त श्री .प्रदीप लाडे व श्री.रामभाऊ येलपले यांच्या सौजन्याने सर्व विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप करण्यात आले.स्कूलच्या शिक्षिका सीमा कदम यांनी आपल्या मनोगतातून भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व स्वातंत्र्यानंतरचा भारत यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात बोलताना बाळासाहेब देसाई विद्यालय चोपडी चे माजी मुख्याध्यापक मा.श्री.दिलीप येलपले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास अजनाळे गावचे विद्यमान सरपंच मा. श्री.विष्णू देशमुख, माजी सरपंच मा. श्री.अर्जुन कोळवले,संस्थाध्यक्ष मा. श्री.शिवाजी लाडे,श्री लक्ष्मण येलपले,श्री.धर्मराज लाडे,श्री.मधुकर पुजारी,श्री.सुनील जगदाळे, ग्रा.प.सदस्य श्री.बापू कोळवले,श्री. ज्ञानेश्वर पांढरे ,मुख्याध्यापिका कावेरी लाडे आदी मान्यवर व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल कोळवले,आभार प्रदर्शन सुजाता पोतदार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत