पायोनियर स्कूल य.मंगेवाडी चा दहावीचा निकाल १००%
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
खंडोबा बहुद्देशीय संस्था संचलित
पायोनियर इंग्लिश,सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल व पायोनियर निवासी गुरुकुल य.मंगेवाडी चा दहावीचा निकाल १००% लागला आहे. शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
योगेश अशोक येलपले याने ९५% मिळवून प्रशालेत प्रथम व वाटंबरे केंद्रात व्दितीय कमांक मिळवला आहे. तसेच स्नेहल प्रवीण येलपले हिने ९२.२०% इंग्रजी माध्यम गुण मिळवून व्दितीय क्रमांक मिळवला आहे. समीक्षा मनोहर सूर्यवंशी हिने ९२% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.ऋतिक चिमाजी गवळी याने ९१% गुण व सारिका सुभाष चौगुले हिने ९०.२०% गुण व पल्लवी दत्तात्रय येलपले हिने ९०% गुण व निखिल प्रभाकर आलदर याने ८९.६०% आदित्य सुभाष घोडके याने ८९% गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले आहे. शाळेचे एकूण ४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यामध्ये ९० च्या वर ६ विद्यार्थी, ८५% ते ९०% च्या दरम्यान ११ विद्यार्थी, ८०% ते ८५% मधे १३ विद्यार्थी ७५% ते ८०% च्या दरम्यान ७ ७०% ते ७५% मध्ये ६ विद्यार्थी, ६५ ते ७० मध्ये ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच मराठीमध्ये सर्वांत जास्त गुण ९५, हिंदी ९४, इंग्रजी ९२, गणित ९८, विज्ञान ९२ व समाजशास्त्र ९८ याप्रमाणे विषयानुसार गुण प्राप्त केले आहे.
पायोनियर शाळेने नेहमीच स्पर्धा परीक्षा असो की बोर्ड परीक्षा शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतातच.पायोनियर चे विद्यार्थी सर्व क्षेत्रात अग्रस्थानी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत