Breaking News

नाझरे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक संपन्न.....! महामानवाने जगण्याचे व लढण्याचे बळ दिले..- अभिषेक भैय्या कांबळे....!!


 

नाझरे प्रतिनिधी 

          महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना जगण्याचे व लढण्याचे बळ दिले व त्यामुळे आज आपण जयंती उत्सव व मिरवणूक काढू शकतो असे मत लहुजी पॅंथर सेनेचे सचिव अभिषेक भैया कांबळे यांनी नाझरे ता. सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणुकीत उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी लहुजी पॅंथर सेनेचे अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नितीन भाऊ रणदिवे यांचाही सत्कार करण्यात आला. 


सदर प्रसंगी प्रतिमेचे पूजन सरपंच विजय सरगर, अभिषेक भैया कांबळे, पत्रकार मिनाज खतीब, रविराज शेटे, मा सरपंच शामराव आप्पा वाघमारे , ग्राम. सदस्य राजाभाऊ गुळीग, व नितीन भाऊ रणदिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बालकलाकारांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सदर प्रसंगी युवा नेते सुभाष कोकरे, सचिन वाघमारे, बाळासो वाघमारे, भारत वाघमारे, सागर वाघमारे, महेश वाघमारे, विकास जावीर नितीन भाऊ रणदिवे मित्रपरिवार, ग्रामस्थ, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत