Breaking News

१८ ऑगस्ट २०२२

प्राथमिक आरोग्य केंद्र अजनाळे येथील आरोग्य सेवक डॉ आशोक कलाल यांचा वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार संपन्न...

अजनाळे: सचिन धांडोरे: प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अजनाळे चे आरोग्य सेवक श्री अशोक विठ्ठल कलाल याना, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त उल्लेखनिय कार्याबद्दल पंचायत समिती सांगोला यांच्या मार्फत संन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सांगोल्याचे आमदार मा. शहाजी (बापू)पाटील ,पंचायत समिती सांगोला गट विकास अधिकारी मा. आनंद लोकरे,बिग बॉस फेम शिने अभिनेते मा. उत्कर्ष शिंदे तहसिलदार मा. अभिजीत पाटील , नगरपालिका मुख्याधिकारी मा. कैलास केंद्रे यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. काल बुधवार दि १७ रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभाग्रह आयोजित करण्यात आलेल्या ७५ स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव पंचायत समिती सांगोला यांच्या वतीने स्वराज्य महोत्सव सांगता समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अजनाळे ता सांगोला येथील कार्यरत असलेले डॉ अशोक कलाल यांचे सन्मान केल्याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी सिमा दोडमणी, माजी जिल्हा परिषद सदस्य संगम धांडोरे,डॉ अजित धायगुडे,आमोल येलपले, पत्रकार सचिन धांडोरे , आरोग्य सेविका सिंधू गडदे, व सर्व आशा वर्कर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा