Breaking News

जवळा येथिल दत्तात्रय मागाडे(भाऊसाहेब) यांचे दुःखद निधन...

अजनाळे: सांगोला तालुक्यातील जवळा येथील दत्तात्रय रामचंद्र मागाडे( भाऊसाहेब) यांचे काल बुधवार दि १७ ऑगस्ट रोजी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ७५ वर्षाचे होते. दिवंगत दत्तात्रय मागाडे हे संघर्ष डिजीटल बँजो ग्रुप चे निर्माते दिवंगत दादासाहेब मागाडे यांचे ते वडील होते. त्यांचा स्वभाव शांत व मनमिळावु होता त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता जवळा येथिल स्मशानभुमित होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत