पंढरपूर प्रतिनिधी: डॉ अमोल उबाळे
पंढरपूर सातारा हा रोड राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या अन् वर्दळ वाढली आहे.सदर रोड लगतच रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल ऑफ सायन्स हे महाविद्यालय व जि. प. प्रा. शाळा आहे.सदर वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे विद्यार्थी व सर्व सामान्य नागरिकांसोबतच तरुणांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.यावरती आळा बसावा म्हणून बस स्टँड परिसर, महिम चौक (चौफळा), व जि. प. प्रा. शाळेच्या गेट समोर (चौगुलेवाडी रोड) वरती रंबल स्पीड ब्रेकर बसवून मिळावेत यासाठी एम एस आर डी सी च्या अधीक्षक अभियंता, पालक मंत्री जयकुमार भाऊ गोरे,जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उप विभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी पंढरपूर, तहसीलदार पंढरपूर, पत्रकार सेवा संघ पंढरपूर विभाग, ग्रामपंचायत भाळवणी यांना पत्र व्यवहार केला आहे. तसेच पंढरपूर पंचायत समितीच्या आमसभेत हा विषय मांडला असता आ.श्री. अभिजीत आबा पाटील, आ. श्री. समाधान दादा आवताडे, आ. श्री. राजू खरे, आ. श्री. बाबासाहेब देशमुख, मा. श्री. संभाजीराजे शिंदे यांनी हा विषय आमसभेच्या प्रोसीडिंग वर घेवून त्वरित मार्गी लावण्यासाठी शब्द दिला आहे.. एवढे करूनही भाळवणी ग्रामस्थांना दि.०७/०३/२५ पर्यंत न्याय न मिळाल्यास मी मोहन इंद्रजीत भोसले दि.१०/०३/२५ पासून न्याय मिळेपर्यंत मारुती मंदीर भाळवणी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे असे लेखी निवेदन संबंधीत कार्यालयांना दिले आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा