Breaking News

य मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रिती जावीर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर... ! : यलमार मंगेवाडी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंच यांच्यावर अविश्वास ठरावाची वेळ...!

अजनाळे: सचिन धांडोरे: 

सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अविश्वास ठरावाची मीटिंग  काल गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी  दु २ वाजता ग्रामपंचायत य मंगेवाडी येथे तहसीलदार संतोष कणसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या वेळी सदस्यांचे गुप्त मतदान घेण्यात आले. या वेळी सरपंच अविश्वास ठरावाच्या विरोधात २ मते पडली  तर सरपंच अविश्वास ठरावाच्या बाजूने ०९ मते पडली असल्याने ९ विरुद्ध २ मतांनी ठराव मंजूर झाल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली आहे.

दि २१ फेब्रुवारी २०२५ रोजी नंदा राजाराम चोरमले व इतर ०७ सदस्यांनी विद्यमान सरपंच प्रिती बापू जावीर मौजे य मंगेवाडी यांचे विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केल्याने सदर सभा आयोजित करण्यात आली होती . अविश्वास ठरावाची नोटीस प्राप्त झाल्याने सर्व सदस्यांना विरोध सभेसाठी उपस्थित राहण्याचा नोटीस नावाच्या प्रतीसह बजावण्यात आली वरिष्ठ कार्यालय, ग्रामसेवक, मौजे य मंगेवाडी गट विकास अधिकारी पंचायत समिती तसेच पोलीस स्टेशन आणी सर्व संबंधित कार्यालयांना याबाबत अवगत करण्यात आले 

दि २७/०२/२०२५ रोजी उपस्थित सर्व सदस्यांचा सह्या घेऊन सभेला सुरुवात करण्यात आली शैला शशिकांत येलपले यांनी सरपंच अविश्वासाचा ठराव मांडला यास सुप्रिया अमोल पाटील यांनी अनुमोदन दिले सभेत नंदा राजाराम चोरमले व इतर ७ सदस्य अविश्वासाच्या ठरावाच्या नोटिसामध्ये जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांशी कायम असल्याचे सांगितले उर्वरित सदस्यापैकी शैला शशिकांत येलपले यांनी अविश्वास प्रस्तावाचे समर्थन करत असल्याचे सांगितले. सदस्य अमोल मोहन चौगुले यांनी अविश्वास ठराव मान्य नसल्याचे सांगितले सरपंच प्रिती बापू जावीर या मागासवर्गीय प्रवर्गाचे असल्याने अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे माझ्याशी अशी वागणूक नसल्याचे सांगितले.ठराव मतदानास टाकले असता ग्रामपंचायत सदस्य अमोल मोहन चौगुले व सरपंच प्रीती बापू जावीर यांनी गुप्त मतदानाची मागणी केली. ग्रामपंचायत सभा नियम २८ नुसार एकापेक्षा जास्त संख्येने किंवा बहुसंख्येने मागणी केल्यास ठराव गुप्त मतदान घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे गुप्त पदसिद्धीने मतदान घेण्याची मागणी सर्वांसमक्ष मान्य करण्यात आली. त्यानुसार ओळीने सदस्यांचे गुप्त मतदान घेण्यात आले. मतदान घेऊन सर्वांसमक्ष मतमोजणी केली असता सरपंच अविश्वास ठरावाच्या बाजूने ९ मते पडली तर विरोधात म्हणजेच सरपंच अविश्वास ठरावाच्या विरोधात २ मते पडली. सरपंच अविश्वास ठरावाच्या बाजूने ०९ मते पडली असल्याने ९ विरुद्ध २ मतांनी ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. या वेळी मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव, ग्रामपंचायत अधिकारी सुरेखा शिंदे , गाव कामगार अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्यासह सांगोला पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत