अजनाळे शेजाळ पाझर तलाव मधून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करणार ; ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर .......! बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांनी तात्काळ पाणी उपसा बंद करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे: सरपंच अनिता पवार...
अजनाळे: सचिन धांडोरे:
सांगोला तालुक्यातील अजनाळे गावातील शेजाळ पाझर तलावामध्ये बेकायदेशीररित्या पाणी उपसा सुरू आहे. अजनाळे गावच्या पिण्याच्या पाण्याची मदार शेजाळ पाझर तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवरती कायदेशीररित्या कारवाई करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर यांनी दिला आहे.
शेजाळ तलावाच्या पाठिमागे अजनाळे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे . त्या विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा केला जातो.परंतु शेतकऱ्यांनी विद्युत मोटराद्वारे बेकायदेशीर पाणी उपसा सुरू केल्यामुळे गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांनी असाच पाणी उपसा सुरू ठेवला तर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पुढील दोन-तीन महिने ग्रामपंचायतीला पाणी विकत घेऊन पाणीपुरवठा करावा लागेल. अशी परिस्थिती असताना देखील बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांनी तात्काळ पाणी उपसा बंद करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावाला पाणीपुरवठा करणे गरजेचे असताना अशातच तलावाच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी पाण्यावर नजर ठेवून बेसुमार पाणी उपसा सुरू केला आहे.परिणामी असाच बेकायदेशीर पाणी उपसा सुरू राहिल्यास पंधरा दिवसाच्या आत अजनाळे गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन अजनाळे करांना पाणीटंचाईला सामोर जावे लागणार हे मात्र नक्की आहे. तरी सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोष कणसे यांनी लक्ष घालून बेकायदेशीर रित्या पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवरती कारवाई करून होत असलेला पाणी उपसा तात्काळ थांबवावा अशी मागणी अजनाळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अनिता पवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ पाणी उपसा थांबवून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आव्हान सरपंच यांनी केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
चौकट : अजनाळे गावातील शेजाळ तलावामध्ये बेकायदेशीर पाणी उपसा सुरू असून यासंदर्भात तहसीलदार, गट विकास अधिकारी, जलसंधारण उपविभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांच्याकडे ग्रामपंचायत च्या वतीने लेखी अर्ज देऊन संबंधित शेतकऱ्यावरती कारवाई करण्यासाठी मागणी केली आहे.
संदिप सरगर ग्रामपंचायत अधिकारी अजनाळे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्या नाहीत