सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
भिमनगर, भाळवणी येथे प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी गुरुवार दि.16/11/2023 रोजी ”डॉक्टर आंबेडकर युथ असोसिएशन (DAYA)” भाळवणी या सामाजिक संघटनेच्या वतीने विविध प्रकारच्या शैक्षणीक, क्रीडा तसेच शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी समाजातील मुलांमध्ये अभ्यासाची गोडी तसेच निकोप शैक्षणिक स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे या उदात्त हेतूने ”तक्षशिला अभ्यासिकेचे” उद्घाटन DAYA ग्रूप चे सन्माननीय सदस्य पशु वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ.शाहीर गायकवाड व सौ. निता नंदकुमार उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याप्रस़गी महिलांची उपस्थिती प्रेक्षणीय होती. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान DAYA ग्रूप चे अध्यक्ष प्रा. श्री. नंदकुमार उबाळे सर यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा मार्गदर्शक श्री. गायकवाड सर यांना पाचारण करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे मान्यवरांचे व समाजबांधवांचे स्वागत ग्रूपचे सदस्य, ग्रामविकास अधिकारी श्री. मारुती भोसले भाऊसाहेब यांनी केले, तर आपल्या सूत्रसंचालना मधून ग्रूपचे उपाध्यक्ष, चिंचणी आदर्श प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षक तथा बामसेफ संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. जालिंदर गायकवाड सर यांनी बामसेफची शैक्षणिक व सामाजिक चळवळ तसेच समाजात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या जाणिव जागृतीबाबत व दया फाऊंडेशन घ्या कार्या विषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थितांमधून श्री. मोहन भोसले व श्री. प्रमोद भोसले यांनी दया ग्रूपच्या उपक्रमांचे विशेष कौतुक करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी RPI चे तालुका अध्यक्ष श्री. सचिन भोसले यांनी दया ग्रूप चे कार्य हे शिक्षणासाठी समाजाला वरदान ठरेल तसेच त्यांच्या कार्यात कुठलीही अडचण आली तर मदत करण्याचे आश्वासन दिले. भाळवणी ग्राम पंचायतचे विद्यमान सदस्य श्री. जिगर गायकवाड व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव श्री. मच्छिंद्र गायकवाड यांनी दया ग्रूप च्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित महिलांमधून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या कु. पूनम भोसले हिने मुले मुली शिकत असताना पुर्वीच्या काळी व चालू काळात येत असलेल्या अडचणी याविषयी तसेच मुलांच्या अभ्यासात पालकांची प्रामुख्याने आईची जबाबदारी यावर छान भाष्य केले. कार्यक्रमातील मुख्यभाग असलेल्या बक्षीस वितरणाची जबाबदारी ग्रूपचे सदस्य व आदर्श प्राथमिक शिक्षक श्री. पवन सातपुते सर तसेच दुसरे सदस्य श्री. समाधान गायकवाड यांनी घेतली. यावेळी मागील वर्षी आवाहन केल्यानुसार इयत्ता 5 वी ते 12 वी मध्ये वर्गात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यास प्राध्यापक नंदकुमार उबाळे सरांनी ठेवलेले रोख रक्कम रु- 1000/- चे बक्षिस कु. संस्कृती पवन सातपुते हिला प्रदान करण्यात आले. तिने गतवर्षी नवोदय विद्यालय,पोखरापूर या शाळेमध्ये वर्गात पहिला क्रमांक पटकावला होता. त्याचबरोबर गावातील मातंग समाजातून वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणारा पहिला विद्यार्थी डाॅ. निखिल साठे यांचेही अभिनंदन करुन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रमुख पाहुणे श्री. नवनाथ लक्ष्मण गायकवाड सर यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व, त्यामुळे समाजाची व गावाची होणारी ओळख पटवून देताना बार्शी तालुक्यातील आगळगांव तसेच माढा तालुक्यातील अधिकार्ऱ्यांचे गांव अशी ओळख असलेल्या उपळाई गावांमधील शैक्षणिक प्रगतीविषयी उपस्थिता़ना माहिती दिली तसेच DAYA ग्रूप च्या कामाचीही स्तुती केली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार उबाळे सर यांनी आपल्या भाषणात DAYA ग्रूपच्या कार्याची पद्धत, राजकारण विरहित काम, तसेच संघटनेने गेल्या ४वर्षाच्या कामाचा आढावा घेत मुलांना समुपदेशन व पालकांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ग्रूपचे सर्व सदस्य आपले काम निस्वार्थ भावनेने, तन मन धन लावून व एकजुटीने करत असेले बद्दल समाधान व्यक्त केले व सर्वांचे तोंडभरून कौतुक केले.
शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंढरपूर तालुका LSS संघटनेचे तालुकाध्यक्ष तसेच DAYA ग्रूप चे सदस्य डॉ. अमोल उबाळे यांनी केले. एकंदरीत हा सर्व कार्यक्रम उत्साहात व खेळी मेळी च्या वातावरणात पार पडला.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी दया संघटनेतील उपस्थित सदस्यांबरोबरच सर्व श्री. प्रा. डॉ. अरुण भोसले, नवनाथ गायकवाड गुरुजी, महसूल अधिकारी विलास गायकवाड, उद्योजक दत्तात्रय ननवरे, ग्रामविकास अधिकारी वैभव गायकवाड, बॅंक मॅनेजर अमोल वाल्मिक गायकवाड, नामांकित फार्मसी कंपनीचे मॅनेजर लक्ष्मण काटे, पेंटींग उद्योजक सोमनाथ भोसले तसेच सहा.पोलिस निरिक्षक समाधान मागाडे या दुरस्थ सदस्यांचे ही सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा