विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
लासुर्णे :- ( ता. इंदापूर ) दि.१९ , बारामती येथील म्हसोबाची वाडी येथील यात्रा आटपून अकलूज येथील बोरगाव यात्रेसाठी जात असताना संत तुकाराम महाराज पालखी मार्ग बारामती इंदापूर रोडवरील लासुर्णे येथील पेट्रोल पंपा समोरील बाजूस उड्डाणपुलाचे काम चालू आहे. तेथून पुढे चढ चालू होतो. त्या चढावरती सायंकाळी सातच्या दरम्यान MH.42.B.9471 या टेम्पो गाडीचे ब्रेक अचानक फेल झाले व टेम्पो चालक याचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी पाठीमागे जोरात वेगाने वाकडी तिकडे येऊ लागली. यावेळी गाडीतील लोकांनी घाबरलेल्या अवस्थेत मोठ्याने आरडाओरडा केला.
प्रसंगी लासुर्णे गावातील रियाज भाई मुलानी, संतोष लोंढे, जयदीप कोळी, आकाश शिंदे, रंजीत कोरटकर, ऋतुराज कदम, इस्तियाक खान, दीपक लोखंडे या तरुणांनी प्रसंगावधानाने पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना वेळीच बाजूला सारत मोठ्या शर्थीने गाडी रोखण्यासाठी रस्त्यालगतचे मोठमोठाले दगड टाकत गाडीच्या चाकांना ओटी देऊन थांबवण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला.
ही गाडी साधारणता शंभर मीटर पर्यंत पाठीमागे आली होती. या टेम्पो गाडीमध्ये एकूण आठ लोक व यात्रेतील लोखंडी मोठे पाळण्याचे साहित्य असे एकूण साडेचार ते पाच टन लोड होता. पालखी मार्गाचे काम चालू असल्यामुळे पाठीमागे एकच अरुंद रस्ता व गाड्यांची मोठी गर्दी होती.
लासुर्णे गावातील तरुणांनी केलेल्या या कार्यामुळे त्यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा