सांगोला गौरव न्यूज नेटवर्क :
खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर सेमी इंग्लिश स्कूल आणि पायोनियर निवासी गुरुकुल य. मंगेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी NMMS परिक्षेत घवघवीत यश संपादन करून १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत २२ डिसेंबर २०२४ रोजी आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS )परिक्षेत एकूण १३ विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवून पायोनियर गुरुकुलच्या स्पर्धा परीक्षेतील उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
या परिक्षेत निवास सुभाष चौगुले , नेहा बाळकृष्ण मासाळ ,सिमरन प्रविण येलपले , प्रथमेश सुभाष आलदर, प्रतिक्षा प्रभाकर आलदर,आयुष प्रविण गेंड, समृध्दी राहुल येलपले ,अनुष्का तानाजी केंगार , श्रीधर आप्पा भोसले , श्रवण पांडुरंग शेजाळ , श्वेता गणेश सुर्यवंशी , मंथन सुशांत बेंद्रे , परिक्षीत परमेश्वर केंगार हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पायोनियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थांना पायोनियर गुरुकुल चे संस्थापक अध्यक्ष श्री.अनिल येलपले सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख आशुतोष रुपनर सर , बाबर सर, घाडगे मिस , पिसे सर व इतर सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा