प्रतिनिधी - संतोष कदम.
पुणे - महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने "घर तिथे रमाई " या अभियानांतर्गत १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२५ पर्यन्त रमाई महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे . या मध्ये ज्ञानाई फाऊंडेशच्या वतीने महामाता रमाईच्या पुतळ्या जवळ ज्ञानाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी लोककवी सीताराम नरके, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक पत्रकार रानकवी जगदीप वनशिव, गायक कवी छगन वाघचौरे, लोक कलावंत अभिनेते जनाबापू पुणेकर, ग्रामीण गीतकार चंद्रकांत जोगदंड आणि गझलकार गायक आनंद गायकवाड, जितेंद्र सोनवणे, निरजंत ठणठणकर, दिप्ती नेहर, सपना गरुड, दिनेश गायकवाड, दशरथ दुनघव यांनी वैचारिक काव्य क्रांती घडून आणली असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर आणि महामाता रमाई, महात्मा फुले व महापुरुषांच्या कविता सादर करून रमाई महोत्सवानिमित्त कवितेचा जागर केला .
रमाईच्या लेकरांची वंदना रमाई पहाट या रमाई महोत्सवात अनेक कवीनी मनोभावे आपली काव्यसेवा सादर केली. तसेच हास्य मैफिल आयोजित करण्यात आली होती. हास्य सम्राट अनिल दिक्षीत, भालचंद्र कोळपकर, रमाई काव्य महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर रमामाता आंबेडकर स्मारक समिती चे मुख्य प्रबुद्ध कवी विठुल दादा गायकवाड, भगवान धेंडे आदि मान्यवर पदाधिकारी उपास्थितीत होते .
लोककवी सीताराम नरके यांच्या *"नऊ कोटी लेकरांची झालीस तू ग आई, बाबांच्या संविधानात दिसते मला रमाई "* या गीताचा लोकार्पण सोहळा झाला .साहित्य सम्राट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ, प्रा .बाबासाहेब जाधव ,राम सर्वगोड ,ॲड .क्षितिज खरात ,दिनेश कांबळे, प्रा .दिलीप वाघमारे, माजी नगरसेवक , विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
पुणे येथील रमामाता आंबेडकर स्मारक व येथे या रमाई महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा