प्रतिनिधी , संतोष कदम.
वालचंदनगर :- वालचंदनगर पाठशाळा क्र .३ येथे पहिली ते चौथीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. मंथन ,कला, वकृत्व यामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी मयुरेश मेटकरी इंटरनॅशनल योगा बुक ऑफ रेकॉर्डसाठी तब्बल 2 तास 33 मिनिटे मकरासन हे आसन करून नवीन इतिहास रचून आंतरराष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा मयुरेश मेटकरी याचा ही विशेष गुणगौरव करण्यात आला.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष श्री. मकरंद वाघ, उपाध्यक्ष श्री. महामुनी, शाळा समिती सचिव व श्री. वर्धमान विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. कुंभारसर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विशाल पाटील सर ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया वाघमारे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीस देण्यात आली.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. वाघ साहेब ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री. विशाल पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पाटमास बी.आर यांनी केले.
यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा