सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
रथ सप्तमी निमित्त सूर्यनमस्काराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे महाराष्ट्र योग शिक्षक महासंघ व योग विद्या धाम यांच्यावतीने जि प प्रा शाळा अजनाळे येथे योगशिक्षिका लक्ष्मी खंडागळे यांनी रथ सप्तमी निमित्त विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगून तणावमुक्त अभ्यासासाठी व उत्तम आरोग्य साठी सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले तीन दिवस सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले व मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी जागतिक सूर्यनमस्काराचे दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्याकडून सूर्यनमस्कार करून घेण्यात आले यासाठी मुख्याध्यापक एकनाथ गुरव गुरुजी, शितल गुरव मॅडम, ज्योती मोरे मॅडम व योगधाम चे प्राचार्य मा अशोक ननवरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा