कोळा येथील अमित मोरे यांचा सार्वभौमिक मानवाधिकार परिषद संघटनेच्या जिल्हा सचिव पदी निवड
कोळा:
कोळा गावचे रहिवासी अमित बाबासाहेब मोरे हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून, जनतेच्या विविध समस्या शासन व लोकपातळीवर सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. सामाजिक न्याय, शिक्षण, स्वच्छता आणि युवकांच्या विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत राष्ट्रीय मानव अधिकार, दिल्ली संस्थेच्या वतीने त्यांची सोलापूर जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती सोलापूर जिल्हा अध्यक्ष सावंता सरगर साहेब यांच्या हस्ते देण्यात आली. या पदामुळे मोरे यांना जिल्हा पातळीवर अधिक प्रभावीपणे मानव अधिकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी या प्रसंगी सांगितले की, “समाजातील दुर्बल घटक, गरीब, शेतकरी व कामगार वर्ग यांच्या न्यायासाठी मी सदैव तत्पर राहीन.” गावकऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत