राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाजातील मोफत वधू-वर मेळाव्याचे मिरज येथे आयोजन...
सांगोला प्रतिनिधी
विवाह जमविणे, मध्यस्थी करणे हे एक धार्मिक, सामाजिक व पुण्याची काम आहे व हा व्यापार किंवा उपजीविकेचे साधन नाही हे ओळखून लिंगायत वधू वर शिवमुर्ती ग्रुप विटा तर्फे लिंगायत समाजातील सर्व जाती उपजातीचा रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत श्री रुद्र पशुपती कोळेकर महाराज मठ मिरज येथे मोफत वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे शिवमुर्ती ग्रुपचे प्रमुख अच्युत दुगमे यांनी सांगितले.
यापूर्वी आपण विटा येथे मोफत मेळावा घेतला होता व सध्या मेळाव्याचे उपयोग फुटले असून फी भरून मिळावे आयोजित केले जातात व त्यापासून काही साध्य होते काही होत नाही परंतु शिवमूर्ती लिंगायत वधू वर ग्रुप विटा या ग्रुप तर्फे मोफत मिळावे घेतले जातात व यामधून समाजाची आर्थिक लूट होत नाही व त्यामुळे त्यांचे काम कौतुकास्पद आहे असे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ठिगळे यांनी सांगितले. सदर मेळाव्यासाठी वधू-वर यांनी उपस्थित राहावे व जास्तीत जास्त व दोन्ही उपस्थित राहून सहकार्य करणे गरजेचे आहे. तसेच मेळावा मोफत आहे तरी याचा लिंगायत समाजातील सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ. शांताबाई दुगमे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत