Breaking News

गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे माळेवाडी अकलूज येथे प्रबोधन


 सांगोला प्रतिनिधी 

      श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरले आणि व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचाच सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे, जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होते. यासाठी रविवार दिनांक पाच जुलै रोजी दुपारी चार वाजता संत सावता माळी मंदिर माळेवाडी अकलूज ता. माळशिरस येथे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामी भक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले. 

      सदर प्रबोधनास उपस्थित राहावे व गुरुभक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते ते समजून येईल तरी स्वामी भक्तांनी हजर राहावे असे आवाहन स्वामीभक्त अनिल फुले, गणेश एकतपुरे, शहाजी बोडके, सुरेश एकतपुरे, रवींद्र फुले यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत