Breaking News
२२ ऑगस्ट २०२२
काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश...
प्रतिनिधी / संतोष कदम.
गंगापूर - वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा गंगापूर तालुका निरिक्षक रामेश्वर तायडे हे गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकी संदर्भात पक्षाच्या तालुका कार्यकारिणी कडुन आढावा घेण्यासाठी आज गंगापूर शहरात आले असता वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस मध्ये गेलेले देविदास लांडे पाटील व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज पुन्हा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला त्यांचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे,शाम भारसाखळे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा गंगापूर तालुका निरिक्षक रामेश्वर तायडे, गंगापूर तालुकाध्यक्ष युनुस पटेल, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब वक्ते, गंगापूर शहराध्यक्ष सुशीलकुमार शिराळे, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग,तालुका उपाध्यक्ष दत्ता गायकवाड,संतोष जाधव,ता सचिव कान्हु भालेराव, तालुका संघटक शांतावन उबाळे, तालुका सचिव किशोर बनकर, सचिन भुजंग, रविंद्र सोनवणे, सईद बाबा पठाण,अमोल केदारे आदींनी अभिनंदन केले आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा