Breaking News

२४ सप्टेंबर २०२२

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळतात; निमगाव केतकी गावामध्ये शिवसैनिकांनी साखर वाटून आनंद उत्सव साजरा केला..


 इंदापूर प्रतिनिधी - संतोष कदम.

इंदापूर  :-  शिवतीर्थावर ती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला माननीय उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे, त्याचाच आनंद इंदापूर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने  निमगाव केतकी गावामध्ये साखर वाटून  फटाक्यांची आतीशबाजी करत आनंद उत्सव साजरा केला , शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी चालू केलेला दसरा मेळावा कोविड चा कालावधी वगळता अखंडितपणे शिवतीर्थावर ती पार पडत होता. एकच नेता एकच व्यासपीठ आणि असंख्य लाखो शिवसैनिक हे समीकरण महाराष्ट्राने बघितले .

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवतीर्थावरती विचारांचे सोने लुटण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होणार आहे त्यावेळेस आपणही उपस्थित रहा असे आवाहन यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अँड. नितीन कदम यांनी केले ,सदर कार्यक्रमा वेळी शिवसेनेचे निमगाव केतकीचे बबनराव खराडे उप तालुकाप्रमुख रणजीत बारवकर ,संजय भोंग ,जगन्नाथ आदलिंग ,अमोल जाधव ,श्याम शेंडे, प्रकाश जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावर्षीचा दसरा मेळावा ऐतिहासिक असेल आणि सर्व रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवणार असेल अशी आशा यावेळी अँड. नितीन कदम यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा