Breaking News

२३ सप्टेंबर २०२२

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकास विद्यालय, अजनाळे येथे वकृत्व स्पर्धा संपन्न...


 अजनाळे:सचिन धांडोरे: देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी विकास विद्यालय जुनियर कॉलेज अजनाळे येथे वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानदेश एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रल्हाद(दादा)येलपले होते तर  प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले, भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष लक्ष्मण येलपले, मुख्याध्यापक शामराव कोळवले, पांडुरंग लाडे, दत्तात्रय लाडे, विलास लाडे, हनुमंत येलपले, गोरख येलपले, राजाभाऊ कोळवले, ग्रामपंचायत सदस्य बापू कोळवले,  लक्ष्मण गुरव महादेव गोयकर, संदीप कुरे, कैलास कुरे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.  वकृत्व स्पर्धा हे तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. ५ वी ते ७ वी लहान गटामध्ये प्रथम क्रमांक विघ्नेश समाधान शेंबडे द्वितीय क्रमांक हर्ष संजय खरात तर तृतीय क्रमांक  तूष्णा दत्तात्रय लाडे तर उत्तेजनार्थ आदर्श प्रल्हाद येलपले या विद्यार्थ्यांनी पटकावला नंतर ८ वी ते १० वी गटामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु साक्षी मधुकर चोरमले, द्वितीय क्रमांक  कु स्नेहल श्रीकांत यलमर, तर तृतीय क्रमांक  कु वेदिका नारायण गुरव,अनुज बाळासाहेब लाडे तर उत्तेजनार्थ कु पुनम धनाजी कारंडे तर खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक कु पूजा काशिलिंग चोरमले, द्वितीय क्रमांक कु स्वाती योगेश भंडगे तर तृतीय क्रमांक  कु दीक्षा चंद्रकांत माईनकर, तर उत्तेजनार्थ  कु पोर्णिमा रमेश चौगुले यांनी पटकवला या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा