Breaking News
२६ ऑगस्ट २०२२
शिरसटवाडी गावामध्ये कदम कुटुंबीयांच्या वतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा
इंदापूर प्रतिनिधी / संतोष कदम.
शिरसटवाडी गावामध्ये सालाबाद प्रमाणे श्रावणी बैलपोळा साजरा करण्यात येतो. इंदापूर तालुक्यात आखाडी बेंदूर अथवा भाद्रपद महिन्यात बैलपोळा साजरा होतो. परंतु शिरसटवाडी गावामध्ये हा श्रावण महिन्यामध्ये साजरा होतो . त्यास ऐतिहासिक परंपरा आहे .
बैलपोळा हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय घरातील आबालवृद्ध लहान मुलं सर्वच बळीराजांनी केलेल्या वर्षभराच्या कष्टाची
उत्तराई करण्यासाठी बैलपोळा सण साजरा करतात.
शेतकरी राजा हा आपले सर्जा राजाला धुवून स्वच्छ आंघोळ घालून रंगीबेरंगी रंगाने नटवुन शिंगांना बेगिडे तर व शेंडीला रंगवून अंगावरती रंगीबेरंगी साज चढवून हलगी वादनाच्या तुर्याच्या उताऱ्यांच्या उत्साहात फटाक्यांची आतीशबाजी करून बैलांची मिरवणूक शिरसटवाडी गावामधुन काढण्यात येते . मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापुढे देशी गाई व बैल जोडी उभा करून त्याचे पूजन केले जाते. जसा लग्न समारंभ असतो, तसा बळीराजाचा लग्न सोहळा सुद्धा आयोजित करतात .
सर्जा राजाला प्रथम पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. ही जुनी परंपरा शिरसटवाडी गावामध्ये आज रोजी युवा पिढी जोपासताना दिसते. शिरसटवाडी गावातील कदम वस्ती येथे शेतकरी बुवासाहेब आबाजी कदम यांचे कुटुंबांच्या वतीने घरातील स्वप्निल कदम ,संग्राम कदम ,अमर कदम तर मुली स्वप्नाली कदम, प्रणिता कदम ,तेजल कदम ,आणि कुटुंबीयांनी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा