Breaking News
२६ ऑगस्ट २०२२
अजनाळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न...
अजनाळे:समाधान धांडोरे:
अजनाळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा शुक्रवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी मानदेश एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद येलपले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी विषय क्रमांक (१) मागील सभेचा कार्य वृत्तांत वाचून कायम करणे (२) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आराखडा व समृद्धी लेबर बजेट तयार करणे (३) विविध शासकीय योजनांचे लाभार्थी निवड करणे (४) आलेल्या अर्जावरती निर्णय घेणे (५) आयत्यावेळी आलेल्या विषयावर माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने चर्चा करणे इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सरपंच सुजाताताई देशमुख, उपसरपंच अर्जुन येलपले, ग्रामसेवक संदीप सरगर, माजी जिल्हा परिषद सदस्य संगम (आप्पा)धांडोरे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजय दादा येलपले, विष्णू देशमुख, आरोग्य सेवक डॉ अशोक कलाल, आरोग्य सेविका सिंधू गडदे, कृषी सहाय्यक ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चंदनशिवे, चंद्रकांत पवार, चंद्रकांत कोळवले, रोहिदास भंडगे,महादेव भंडगे, कोतवाल नवनाथ इंगोले,पोलिस पाटील संतोष भंडगे, ग्रामपंचायत सदस्य बापू कोळवले,चेअरमन हणमंत येलपले, यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा