मा. प्राचार्य स्व. सुब्राव बंडगर सर अभ्यासिकेचे उद्घाटन व माणहिरा या ग्रंथाचे प्रकाशन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न..
सांगोला प्रतिनिधी
अनकढाळ गावाच्या व चोपडी गटाच्या विकासासाठी अनेक योजना लोकांपर्यंत. पोहोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे मा. प्राचार्य स्व. सुब्राव बंडगर सर होते व माझ्या निवडणुकीत त्यांनी गुडघ्याचा त्रास असताना सुद्धा फिरून प्रचार करून जीवाचे रान केले तसेच मी सरांचे सुपुत्र विनायक व प्रताप यांना विनंती करायचो की सरांच्या गुडघ्याच्या वाट्या बदलूया परंतु विमल काकी यामध्ये मला अपयश आले व स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख, स्वर्गीय वसंतराव पाटील यांचा विचार खांद्यावर घेऊन सुब्राव व हनुमंत बंडगर सर यांनी काम केले व एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून सुब्राव सर होते असे मत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अनकढाळ ता. सांगोला येथे सुब्राव बंडगर सर अभ्यासिकेचे उद्घाटन प्रसंगी व मान हिरा ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून व्यक्त केले.
सुरुवातीस स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख व स्वर्गीय सुब्राव बंडगर सर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच अभ्यासिकेचे उद्घाटन ही करण्यात आले, तसेच प्रा. डॉ किसन माने संपादित इंद्रजीत घुले यांच्या शब्द शिवार प्रकाशन प्रकाशित माणहिरा या स्वर्गीय सुब्राव बंडगर सर यांच्या स्मृती ग्रंथाचे प्रकाशनही मोठ्या थाटामाटात आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते व निकिता ताई देशमुख यांच्या व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक नवनाथ बंडगर सर यांनी करून यामधून सरांचा लेखाजोखा सांगितला. तसेच डॉ. निकिता ताई देशमुख, प्रा. डॉ किसन माने, मा. उपसभापती संतोष देवकते, मा शिक्षणाधिकारी विष्णू सरगर, शिक्षक नेते अशोक पाटील यांनीही मनोगतात सरांच्या कार्याची माहिती सांगितली. सदर प्रसंगी सर्वांचे स्वागत मा. सरपंच विजय बंडगर, उत्तम पाटील, राजू बंडगर, दत्ताभाऊ बंडगर, विनायक बंडगर, शंकर बंडगर यांनी स्वागत केले. सदर प्रसंगी मा. नगराध्यक्ष सुरेश माळी, शेकाप सरचिटणीस दादासो बाबर, मा.जि.प. सदस्य गजेंद्र कोळेकर, संगम धांडोरे, खरेदी विक्रीचे चेअरमन रमेश जाधव, जि.प. सदस्य किरण पांढरे, सौ. संगीता मोटे. मा.प.स. सदस्य सिताराम सरगर, बंडू शिंगाडे, राम ढोण, युवा नेते उल्हास दादा धायगुडे, परमेश्वर कोळेकर, शिवाजी मिसाळ सर, मा. उपसभापती सुनील चौगुले, मा. सरपंच बापूसो चौगुले, हनुमंत सरगर, बाळासो शिंदे, संजय सरगर, संजय आदाटे, ज्येष्ठ नेते बालेखान शेख, ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी बंडगर, राजमाता पतसंस्था चेअरमन कुंडलिक आलदर, सूतगिरणी चेअरमन कल्पनाताई शिंगाडे, वाय चेअरमन वंदनाताई बाबर, वंदनाताई सरगर, मार्केट कमिटी संचालक आबा आलदर, ग्रामीण साहित्यिक मुकुंद वलेकर, दूध संघ संचालक मारुती ढाळे, उद्योजक मदन रायचूरे,, मा. उपसरपंच सचिन कोकरे, आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके, सरपंच रंगनाथ बंडगर, वस्ताद बंडगर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसा. चेअरमन अनिल बंडगर, व्हा. चेअरमन राजेंद्र अडसूळ, बंडू भाऊसाहेब, रविराज बंडगर, सुनील अडसूळ, सर्व सोसा. सदस्य, उद्योजक गिरीश भाऊ नष्टे, ग्रामस्थ, महिला, युवा वर्ग व बंडगर परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन अरुण बंडगर तर सर्वांचे आभार मा. पिंटू बंडगर यांनी मानले.
मा. प्राचार्य स्व. सुब्राव बंडगर सर निष्ठावान कार्यकर्ते
मा. प्राचार्य स्वर्गीय सुबराव बंडगर सर हे स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे हाडाचे व निष्ठावान कार्यकर्ते तर होतेच परंतु त्यांच्यावर पुस्तक प्रकाशित करताना आनंद होत आहे या पुस्तकाची इतिहासात नोंद होईल.
मा. इंद्रजीत घुले कवी, लेखक
शब्द शिवार प्रकाशन मंगळवेढा.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत