Breaking News

पायोनियर स्कूल, य. मंगेवाडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


सांगोला गौरव न्यूज नेटवर्क 

पायोनियर इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश स्कूल, यलमर मंगेवाडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय सतीश देवमारे सर, संस्थेचे अध्यक्ष माननीय अनिल येलपले सर, तसेच सर्व HOD आणि सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परवीन मॅडम यांनी केले. महिला शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली.

या प्रसंगी प्री-प्रायमरी विभागाच्या HOD बबीता राऊत मॅडम, प्रायमरी HOD वैशाली येलपले मॅडम, 5वी ते 7वी विभागाचे HOD आशुतोष रुपवर सर, तसेच सेकंडरी विभागाचे HOD बाबर सर यांनीही सदिच्छा व्यक्त केल्या.

मुख्याध्यापक देवमारे सर तसेच संस्थाध्यक्ष अनिल येल्पाले सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र, त्यांचा खडतर प्रवास, शिक्षणासाठी त्यांचे योगदान आणि समाजातील अन्यायाविरुद्ध केलेला संघर्ष यावर प्रकाश टाकला.

मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न, शेण–चिखल–दगडफेक सहन करूनही शिक्षणाचे कार्य न थांबविण्याची त्यांची जिद्द विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. 1848 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून समाजात क्रांती घडवून आणण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रिन्सिपल देवमारे सर यांनी मुलींना चांगला संकल्प करून सावित्रीबाईंसारखे ध्येयवादी कार्य करण्याचा सल्ला दिला.

शेवटी HOD रुपनर सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत