कोळे येथील आनंद बाल व इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये घवघवीत यश...
कोळा प्रतिनिधी:
कोळे येथील आनंद बाल व इंग्लिश स्कूलच्या, कोळपे सर यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग येथे पार पडलेल्या नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे, गावाचे व जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्वल केले आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाच्या पार्श्वभूमीवर आज सार्वभौमिक मानवाधिकार परिषद या संस्थेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सावंता सरगर, जिल्हा सचिव अमित मोरे आणि संस्थेचे अध्यक्ष अशोक कोळपे सर यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा यशाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी SP अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या कष्टाचे व शिस्तीचे कौतुक करत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी विहार, कोळे येथे भेट देण्याचे आश्वासनही दिले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील क्रीडाप्रतिभेला नवी दिशा मिळाली असून, पुढील पिढीसाठी हा एक प्रेरणादायी आदर्श ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत