Breaking News

दिवाणवाडा येथे चिमुकल्यांनी भरावाला स्वतःचा बाजार आणि गिरवला व्यवहार ज्ञानाचा धडा


 कोळा  प्रतिनिधी

जिल्हा परिषद शाळा कोळे दिवानवाडा मुले मुली येथे चिमुकल्यांनी भरवलेल्या स्वतःच्या बाल आनंद बाजाराने सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले लहानग्यांनी थेट बाजार उभारून विक्री खरेदीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने हा उपक्रम केवळ शालेय कार्यक्रम न राहता शिक्षणातील आदर्श प्रयोग ठरला इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थ ; हस्तकला वस्तू ;  खेळणी ; चित्रे ; कागदी सजावटीच्या वस्तू आदींचे आकर्षक स्टॉल उभारले  स्वतः किंमत ठरवणे ग्राहकांशी थेट संवाद व्यवहारातील प्रामाणिकपणा नफा तोट्याची जाणीव बचत व नियोजन यांचे धडे विद्यार्थ्यांनी खेळता खेळता घेतले. 

सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष चोरमुले ताई व क्षीरसागर ताई व आलेल्या महिला भगिनी यांच्या हस्ते प्रथम पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली या बाल आनंद बाजारचे फीत कोळा ग्रामपंचायतच्या माजी सदस्या वंदनाताई सरगर कोळा गणाचे पंचायत समितीचे सदस्य श्री सिताराम ( तात्या ) सरगर शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री अंबादास सरगर ; शिक्षक तज्ञ निलेश मदने सर शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय भाले कोळा मुले शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक तंडे सर व पालक वर्ग यांच्या हस्ते फीत कापून प्रत्यक्ष बाजाराला सुरुवात झाली या आनंद बाजारात सर्वात आकर्षक म्हणजे आलेल्या पालक वर्गासाठी लकी ड्रॉ आयोजन केले होते या लकी ड्रॉ मधून भाग्यवान पाच महिलांना बक्षीस देण्यात आले पालक ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षण कमी प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे मनापासून कौतुक केले शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांच्या मार्गदर्शनामुळेहा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वी ठरला. बाल आनंद बाजारमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नेतृत्व गुण सहकार्याची भावना व उद्योजक वृत्ती विकसित झाली. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर जीवन उपयोगी कौशल्य घडविणे हे या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले दिवाणवाडा शाळेचा हा अभिनव उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला असून  बाल आनंद बाजार मुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास ; नेतृत्व गुण सहकार्याची भावना ; उद्योजक वृत्ती विकसित झाली.शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके ज्ञान नव्हे तर जीवन उपयोगी कौशले घडविने हे या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले  ; दिवाणवाडा शाळेचा अभिनव उपक्रम परिसरा चर्चेचा विषय ठरला असून शाळांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनला आहे हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक श्री वाघमोडे सर ; ननवरे सर ; पटेल मॅडम ; गुळीक सर ; आदलिंगे मॅडम ; श्री तांबोळी सर ; श्री नाईकवाड सर यांनी मेहनत घेतली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत