Breaking News

वझरे प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुभाष कोकरे तर उपाध्यक्षपदी सौ. उज्वला कोटी यांची निवड


 सांगोला प्रतिनिधी 

    जि. प. प्रा. शाळा वझरे ता. सांगोला येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी सुभाष गणपत कोकरे यांची तर उपाध्यक्षपदी सौ. उज्वला राकेश कोटी यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. बानू चव्हाण या होत्या. सदर प्रसंगी अध्यक्ष, उपाध्यक्षा, सर्व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. 

   सदर प्रसंगी भोजलिंग कोकरे, मल्हारी गुरव, नाथा जावीर, पुजा रेड्डी, स्वाती वाघमारे, उज्वला चव्हाण यांची सदस्य पदी तर मुख्याध्यापिका लता पाटील यांची सचिव पदी निवड करण्यात आली. 

यावेळी मा. अध्यक्ष सुरेश रेड्डी, मा. उपाध्यक्ष नितीन निंबाळकर, शिक्षण प्रेमी आनंदा कोकरे, महेश वाघमारे, मल्हारी चव्हाण, वसंत पाटील, राकेश कोटी, समाधान रेड्डी, महादेव सरगर, जगन्नाथ वाघमारे, नागिन कोटी, नितीन कोकरे, शंकर गावडे, अमोल रेड्डी, शिक्षक दत्तात्रय पाटील, खंडू गाडेकर, मेघा राणी गुरव, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार सचिव लता पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत