नाझरे येथे उल्हास धायगुडे यांच्या जनहित कार्यालयातर्फे सत्कार संपन्न...
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथील उल्हास दादा धायगुडे यांच्या जनहित संपर्क कार्यालयातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी उल्हास धायगुडे हे होते.
जनहित कार्यालय तर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार रविराज शेटे, वजरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी निवड झालेले सुभाष कोकरे व बलवडी सरपंच ज्ञानेश्वर माऊली राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्केट कमिटी संचालक बंडू मामा आदाटे, मा. उपसरपंच गणीसो काझी, उद्योगपती दत्तात्रय शेळके, परमेश्वर धुरे, आनंदराव मेटकरी, अलीम काझी, सुरेश कोकरे, सुनील पाटील, विलास चव्हाण, आदिनाथ वारे, राधेश काळे इ. उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार उल्हास दादा धायगुडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत