Breaking News

एक कॉल प्रॉब्लेम सॉल.. लोकनियुक्त नगराध्यक्ष यु.टी. जाधव..! लोकनियुक्त नगराध्यक्ष यु. टी. जाधव यांचा नाझरे येथे सत्कार


नाझरे प्रतिनिधी 

     शिक्षकी पेशातून रस्त्यावर लढलो व रणांगण हरले परंतु मन हरले नाही व नाझरे ता. सांगोला येथे आपण आज माझे मतदार नसताना सुद्धा सत्कार करीत आहात त्याचा आम्हास अभिमान असून, आपण यापुढे येथील व्यापाऱ्यांचे प्रश्न व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना पाहणार नाही, त्यांना न्याय मिळवून देऊ व यासाठी एक कॉल करा म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल अशी रचना करू अशी आटपाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यु टी जाधव यांनी नाझरे ग्रामपंचायत समोर सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मा. उपसभापती सुनील चौगुले हे होते.  

   देशात व राज्यात भाजपा एक नंबर असून, आटपाडीचे भूमिपुत्र व जतचे विकास पुत्र आमदार गोपीचंद पडळकर, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजप नेते अमर बापू देशमुख यांची खंबीर साथ व आटपाडी व परिसरातील मतदारांची, शिक्षकांची साथ आपणास मिळाल्यामुळे आटपाडीचे नगराध्यक्ष पद मिळवून एक इतिहास घडला. व विकासासाठी कामा सुट्टी घेणार नाही. व नाझरे येथे जो ग्रामपंचायत, शिक्षक संघटना, मित्रपरिवार यांनी जो संताच्या भूमीत माझा व माझ्या पत्नीचा सत्कार केला त्याची उंची वाढवू असे मत ही सत्कार प्रसंगी नूतन नगराध्यक्ष यु.टी. जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी नगरसेविका ललिता जाधव, सौ स्वाती सातारकर, सुभाष सातारकर, शिक्षक नेते रवी पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष यु.टी. जाधव व त्यांच्या धर्मपत्नी सौ अनिता जाधव यांचा सपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुभाष कोकरे, पत्रकार रविराज शेटे यांचाही सत्कार करण्यात आला. सुरुवातीस सर्वांचे स्वागत प्रा. विजय गोडसे यांनी केले. यावेळी मा. उपसभापती सुनील चौगुले, शिक्षक नेते अशोक पाटील, शिवाजीराव होनमाने, सुनील बनसोडे, राजाराम बनसोडे, नयन पाटील, रवी पाटील, भाजपा नेते नंदकुमार रायचुरे, उल्हास दादा धायगुडे, दादासो हरिअर इ.नी मनोगत व्यक्त केले. 

     सदर प्रसंगी सरपंच डॉ. विजय सरगर, मा. सरपंच संजय सरगर, महालिंग पाटील मा. उपसरपंच शशिकांत पाटील, दिलीप बनसोडे, संजय आधाटे, भारत बनसोडे, अडसूळ भाऊसो, बसवेश्वर आधाटे, राजू खोकले, सौ. कस्तुरा पाटील, रविराज स्वामी, जयंत काका देशपांडे, आनंदा कोकरे, प्रा. टी. के. वाघमारे, प्रा. महालिंग पाटील, सोसा. चेअरमन श्रीमंत सरगर, व्हॉइस चेअरमन गोरख भाऊ आदाटे, सामाजिक कार्यकर्ते अप्पू राज आदाटे, तुकाराम कुंभार, बाळासो वाघमारे, भारत वाघमारे, सागर वाघमारे, प्रगतशील शेतकरी सिताराम मामा बनसोडे, हनुमंत खंडागळे, शिक्षक नेते एकनाथ जावीर, संजय बनसोडे, विजय जावीर, गंगाधर जोंधळे, मनोहर बंदवडे, राजाराम पाटील, प्रसाद देशपांडे, सुधीर बनसोडे, संतोष आधाटे, बाळासो बनसोडे, सचिन धोकटे, शिवाजी अडसूळ, सुरेश बनसोडे, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार शिक्षक शिवभूषण ढोबळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत