संविधान अमृत महोत्सव "घर घर संविधान" कार्यक्रमांतर्गत उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेतील विद्यार्थ्यांची रॅली.......
मंगळवेढा प्रतिनिधी:
भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने सर्वत्र संविधान अमृत महोत्सव "घर घर संविधान" हा उपक्रम राबविला जात आहे. भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये भारतीय संविधाना बाबत सर्वसाधारण माहिती देणे, संविधानाची तत्त्वज्ञान आणि मूल्य समजावून सांगणे, विविध स्पर्धा राबवणे यासारखे उपक्रमांचा समावेश आहे.त्या अनुषंगाने उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेतील विद्यार्थ्यांची रॅली दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. मंगळवेढा शहरातील विविध भागातून घेण्यात आली. या रॅली मध्ये प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते त्याचबरोबर न. पा.शाळा नंबर ३ या शाळेतील विद्यार्थीही सहभागी झाले होते.संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्ये सादर करत जन माणसांचे लक्ष वेधून घेतले.
या रॅली दरम्यान डॉ.बिभीषण रणदिवे प्रशासन अधिकारी न.पा. शिक्षण मंडळ, मंगळवेढा. सिद्धेश्वर जाधव न.पा.शाळा नंबर ३ मुख्याध्यापक , येताळा खरबडे सदस्य जिल्हा दक्षता समिती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशालेत परत आल्यानंतर सर्व मान्यवरांचा प्रशाले कडून यथोचित सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांनी समजावून सांगितले. विद्यार्थ्यांकडून संविधानाची उद्देशिका वाचनाने या रॅलीची सांगता झाली.
मंगळवेढा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे विश्वस्त डॉ.नंदकुमार शिंदे ,स्त्रीरोग व प्रसुती शास्त्रतज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे प्रशालेचे प्रा. सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली उत्तमरित्या पार पडली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत