नाझरे शाळेच्या आनंद बाजारात 149 स्टॉल व 29 हजाराची सुमारे उलाढाल
नाझरे प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबर व्यवहारी ज्ञान प्राप्त व्हावे हा उद्देश ठेवून जि.प. प्रा. शाळा नाझरे ता. सांगोला या शाळेमध्ये बाल आनंद बाजारात 149 स्टॉल द्वारे सुमारे 29 हजाराची उलाढाल झाली.
आनंद बाजाराचे उद्घाटन मा. उपसभापती सुनील चौगुले, सरपंच डॉ. विजय सरगर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ओंकार देशपांडे, मा. उपसरपंच शशिकांत पाटील, विजय गोडसे, महादेव पांढरे यांच्या शुभहस्ते व शालेय समिती सदस्य सौ. स्वाती वाघमारे, नितीन जावीर, समाधान भंडारे, विठ्ठल माने, सौरभ पाटील, नितीन बनसोडे, रुखया मुलानी, सौ. शशिकला सुतार, सौ मंगल चव्हाण, सौ उज्वला गुरव, सौ सुरेखा हिंगमिरे, सौ रसिका ढोबळे, पालक, शिक्षक, विद्यार्थी इत्यादींच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर प्रसंगी मुख्याध्यापक राजाराम कोळी, शिक्षक गंगाधर जोंधळे, श्रीमती नयना पाटील, शिवाजी अडसूळ, श्रीमती योगिता शांत, श्रीमती सुनिता विधाते, श्रीमती माधुरी जोंधळे, दादासाहेब बदडे, पालक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत