Breaking News

कोळे जिल्हा परिषद गटातून पै. अनिल होळकर निवडणूक लढविणार...

सांगोला प्रतिनिधी 

     राज्यात व सोलापूर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण तापू लागले असून, कोळे जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. व यंदा परिवर्तन अटळ असून, अनेक इच्छुकांसाठी ही एक मोठी राजकीय संधी निर्माण झाली असून, या संधीचे सोने करण्याचा निर्धार पैलवान अनिल बाळासाहेब होळकर यांनी केला असून, आपले मार्गदर्शक मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कोळा जिल्हा परिषद गट पूर्ण ताकतीने लढणार असून, गुलाल आपलाच असे ठासून सांगितले आहे. 


    पैलवान अनिल होळकर यांनी मतदाराचा थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, प्रत्येक गावात विकासाच्या मुद्द्यावर चर्चा सध्या सुरू आहे. स्थानिक पातळीवर त्यांच्या नेतृत्वावर सकारात्मक चर्चा असून त्यांच्याकडे विकासाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. कोळा व परिसरात सर्वांच्या सुखदुःखात त्यांचा मोठा सहभाग असून, परिसरात त्यांच्या कामाची छाप गावोगावी त्यांच्या नावावर चर्चा सुरू आहे यामधून दिसून येत आहे. जनतेच्या विश्वासावर आणि सहकार्यावर आम्ही पुढे जाणार आहोत असे सांगून होळकर यांनी निवडणुकीच्या रणधुमाळी ची चाहूल दिली आहे. कोळा जिल्हा परिषद गटात यंदा रंगत वाढणार असून, मतदाराच्या आशीर्वादावर आम्हीही निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार व जनतेने दिलेली ही संधी विकास माध्यमाच्या माध्यमातून परतफेड केली जाणार आहे व त्यामुळे पैलवान अनिल होळकर यांच्या उमेदवारीवर सर्वांचे लक्ष लागले आहे, आपले वडील बाळासाहेब होळकर हे एक नामांकित कुस्तीपटू होते व त्यांनी किडे बिसरी गावातून ग्रामपंचायत निवडणूक लढवून यशस्वी झाले व त्यामुळे आपणास राजकीय बाळकडू घरापासून मिळाले. राजकारणाच्या पलीकडे आपण समाजकारणास प्राधान्य देत असून, नागरिकांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे, युवकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यास अग्रेसर असून, अनाथ आश्रम व शालेय विद्यार्थ्यांनी शालेय वस्तू वाटप करून आपला उपक्रम प्रत्येक वर्षी राबवत असतात  तर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा ही जर वर्षी आपल्या भागातील होतकरू मल्लासाठी ते घेत असतात एक नावाजलेले नाव म्हणून पैलवान अनिल होळकर यांच्याकडे पाहिले जात आहे. मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे विश्वासू, निष्ठावंत सहकारी म्हणून ही होळकर यांना गणले जात आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत