सदाशिवनगर प्रतिनिधी: हुसेन मकबूल मुलाणी:
प्रज्योत तात्या मित्र मंडळ सदाशिवनगर गणेश मंडळाच्या गणरायाची आरती धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्थेचे संचालक व मंडळाचे जेष्ट कार्यकर्ते श्री शौकत इमाम मुलानी यांच्या हस्ते आज रविवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी संपन्न झाली
याप्रसंगी सदाशिवनगरचे माजी सरपंच प्रताप सालगुडे पाटील , शामराव जाधव , जिव्हाळा फाउंडेशन चे उपाध्यक्ष तन्वीर शेख ,संतोष गुराप्पा स्वामी मंडळाचे अध्यक्ष विश्वजीत सालगुडे पाटील, उपाध्यक्ष योगेश बबनराव शिदे, व्यवस्थापक जगदीशा सोनटक्के, रियाज मुलाणी व मंडळाचे सर्व कायेकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मंडळाने हिंदू मुस्लिम एकतेचा एक वेगळा आदर्श जगासमोर दाखवून दिला आहे त्यामुळे सदाशिवनगर परिसरामध्ये मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे
आरतीनंतर सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला सत्कार यामध्ये शौकत इमाम मुलाणी यांचा सत्कार मंडळाचे जेष्ट कार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला व रियाज शौकत मुलाणी यांचा सत्कार मंडळाचे माजी अध्यक्ष सागर उरवणे यांचे हस्ते करण्यातआला
उपस्थित गणेश भक्तांना सायंकाळच्या प्रसादामध्ये शीरखुर्मा वाटप करण्यात आला सर्व गणेश भक्तांनी प्रसादाचा आनंद घेतला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा